डांगमाळी आळीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्रीकृष्ण जन्मसोहळा उत्साहात

डांगमाळी आळीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्रीकृष्ण जन्मसोहळा उत्साहात

हडपसर : हडपसरमधील डांगमाळी आळी येथील सुमारे ४०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गोपाळकाला निमित्ताने मंदिरात २४ तासांचा विनापहारा सोहळाही आयोजित करण्यात आला होता.

शुक्रवारी रात्री : श्रीकृष्ण जन्मसोहळा

शुक्रवारी रात्री श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जन्माचे कीर्तन झाले. श्रीकृष्ण जन्माच्या वेळी महिलांनी पारंपरिक पद्धतीने पाळणा म्हटला. यावेळी उपस्थित भाविकांनी जन्मोत्सवात सहभाग घेतला. जन्मसोहळ्यानंतर मंदिरातील २४ तासांच्या विनापहारा सेवेचा क्रम सुरू राहिला.

शनिवारी : दहीहंडी, कीर्तन आणि गोपाळकाला

शनिवारी सकाळी मंदिर परिसरात दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ह. भ. प. कोल्हे महाराज यांची कीर्तन सेवा झाली. कीर्तनानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

शनिवारीच २४ तासांच्या विनापहारा सोहळ्याची सांगता करण्यात आली. या सेवेत सहभागी झालेल्या २४ पहारेकऱ्यांचा मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. हडपसर परिसरातील गावकरी, ग्रामस्थ, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वारकरी संप्रदायातील भाविक या कार्यक्रमास उपस्थित होते.

‘जय हरी विठ्ठल’च्या नामघोषात श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!