हडपसर विषारी दारू प्रकरणी तीन पोलिस अधिकारी निलंबित

हडपसर विषारी दारू प्रकरणी तीन पोलिस अधिकारी निलंबित

 

हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणात निष्काळजीपणा व कर्तव्यातील हलगर्जीपणाचा ठपका ठेवत पुणे शहर पोलिस दलातील तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याबाबतचे आदेश दिले आहेत.

निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये हडपसर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, हडपसर पोलिस चौकीच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार आणि गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांचा समावेश आहे.

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी अथवा विषारी दारू पिल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. यामध्ये १२ जणांनी प्राण गमावला आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदेशानुसार, अवैध दारू विक्रीबाबत माहिती असूनही प्रभावी कारवाई करण्यात संबंधित अधिकारी अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणामुळे पोलिस दलाच्या प्रतिमेलाही धक्का बसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Disqus (3 )
error: Content is protected !!