कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयात गेल्या १५ दिवसांपासून पाणी नाही; स्वच्छतागृहाला कुलूप

कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयात गेल्या १५ दिवसांपासून पाणी नाही; स्वच्छतागृहाला कुलूप

पुणे,

पुणे महानगरपालिकेच्या कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयात गेल्या १५ दिवसांपासून पाण्याचा पुरवठा बंद असून, त्यामुळे कार्यालयातील स्वच्छतागृहाला कुलूप लावून बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या क्षेत्रीय कार्यालयात जन्म-मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी, समाज विकास विभाग, कर वसुली अशा विविध कामांसाठी दररोज शेकडो नागरिक येत असतात. यात मोठ्या संख्येने महिला आणि वृद्ध नागरिकांचा समावेश असतो. पाणी नसल्याने स्वच्छतागृह बंद असल्याने विशेषतः महिलांची मोठी कुचंबना होत आहे.

या गंभीर प्रकाराबाबत नागरी कृती समितीचे श्री. अर्जुन सातव म्हणाले, “एकीकडे पुणे महानगरपालिका दरवर्षी स्वच्छ आणि सुंदर शहराचे पुरस्कार घेते, मात्र आपल्याच क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांसाठी मूलभूत सुविधा – पाणीही पुरवू शकत नाही, ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी.”

पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास नागरी कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!