
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
मना न्युज नेटवर्क
हडपसर,
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त हिंदुप्रेमी प्रतिष्ठान व रुद्रतेज वाद्यपथक यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर गाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रक्तदान शिबिर पुणे ब्लड बँक यांच्या सहकार्याने पार पडले. समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपत तब्बल २५८ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
यावेळी हिंदूप्रेमी प्रतिष्ठान च्या नव्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन अमित गायकवाड, संजय पारिख, संकेत झेंडे, विकास गदादे, माऊली कुडले, भूषण देशपांडे, पंकज रणभोर, सुनील माळी, ओंकार मांगडे, कपिल गायकवाड, मयूर चांदगुडे, मेहबूब शेख, सनी बारवकर यांनी केले.
कार्यक्रमास माजी आमदार महादेव बाबर, नगरसेवक प्रशांत तुपे नगरसेविका उज्वला जंगले, नगरसेवक नितीन गावडे, , रवी तुपे, भूषण तुपे, उल्हास तुपे, सुभाष जंगले, अभिजीत बोराटे, अविनाश काळे,अप्पा हाडके, आकाश डांगमाळी, सविता हिंगणे, राहुल तुपे, महेश रणवरे, सागर शिरोडकर, संतोष हिरवे, गणेश वाघ, विनोद रासकर, अजय महाजन आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

