
महाराष्ट्रनामा इफेक्ट! प्रशासनाला जाग
हडपसर,
सातव नगर येथील तुंबलेल्या चेंबरच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाची कारवाई सुरू.सातव नगर परिसरातील तुंबलेल्या चेंबरमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत महाराष्ट्रनामाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
नागरिकांच्या मूलभूत सुविधांची देखभाल करणे आणि त्यांच्या समस्या वेळेत सोडवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिकांच्या समस्येची दखल घेत प्रशासनाने सातव नगर येथील तुंबलेल्या चेंबरच्या दुरुस्तीची कारवाई सुरू केली आहे.
या कारवाईबद्दल सातव नगर परिसरातील नागरिकांनी महाराष्ट्रनामा चे आभार मानले.नागरिकांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्रनामा सातत्याने आवाज उठवत राहील.

