हडपसर-मांजरी प्रभाग समितीसाठी २७ प्रतिनिधी पात्र, एक अपात्र

हडपसर-मांजरी प्रभाग समितीसाठी २७ प्रतिनिधी पात्र, एक अपात्र

पुणे, ता. १७ : हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीमध्ये बिनसरकारी आणि समाजलक्षी संघटनांच्या प्रतिनिधींसाठी आलेल्या अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. एकूण २८ अर्जांपैकी २७ जण पात्र ठरले असून एकाचा अर्ज अपात्र ठरवण्यात आला आहे.

महापालिकेच्या सहा. आयुक्त कार्यालयामार्फत ही पात्र यादी जाहीर करण्यात आली आहे.

पात्र ठरलेले प्रतिनिधी असे : हरिभाऊ काळे, सागर प्रभुणे, प्रतिक खेडकर, आकाश डांगमाळी, राहुल शिंदे, दिलीप तुपे, प्रविण प्रधान, सिमा शेंडे, समिर घुले, गौरव म्हस्के, दिपक हिंगणे, गणेश घुले, मनीषा तुपे, अनिल शिंदे, पल्लवी सुरसे, सविता हिंगणे, सचिन हिंगणे, स्मिता गायकवाड, रवींद्र चव्हाण, स्वप्निल तुपे, उर्मिला आरु, रवींद्र होळकर, शुभांगी कांबळे, संकेत शिंदे, रेश्मा जगदाळे, ज्ञानेश्वर कुडले आणि मिलिंद तुपे.

दरम्यान, केशवनगर येथील रविशंकर विठ्ठल पवार यांचा अर्ज निकषांची पूर्तता न झाल्याने अपात्र ठरविण्यात आला आहे.

पात्र प्रतिनिधींना प्रभाग समितीच्या पुढील बैठकीबाबत स्वतंत्र कळविण्यात येणार असल्याची माहिती क्षेत्रीय कार्यालयाकडून देण्यात आली.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!