फुरसुंगी पोलिसांची वाहन चोरीविरोधात कारवाई; दुचाकीसह आरोपी ताब्यात

फुरसुंगी पोलिसांची वाहन चोरीविरोधात कारवाई; दुचाकीसह आरोपी ताब्यात

मना  न्यूज नेटवर्क

फुरसुंगी :

फुरसुंगी पोलिसांच्या तपास पथकाने वाहन चोरीविरोधात मोठी कारवाई करत चोरीस गेलेली दुचाकी जप्त करून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गंगानगर परिसरात करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मे २०२६ रोजी रात्री १०.३० ते ७ मे रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान महात्मा फुले वसाहत, कॅनॉल जवळ, गंगानगर फुरसुंगी येथून फिर्यादी यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरिष्ठांच्या आदेशानुसार वाहन चोरी, घरफोडी व अवैध धंदे रोखण्यासाठी तपास पथक पेट्रोलिंग करत असताना गंगानगर स्मशानभूमी परिसरात संशयित व्यक्ती दुचाकीसह उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कृष्णा रविंद्रसिंग भोंड (वय १९, रा. तुळजाभवानी वसाहत, कॅनॉल, हडपसर) याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे असलेली हिरो कंपनीची पॅशन मोटारसायकल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चौकशी केली असता ती महात्मा फुले वसाहत परिसरातून चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली. त्यानंतर पोलिसांनी चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली.

हि कामगिरी पोलीस उपआयुक्त परि.-०६ चे जिवन बेनीवाल, शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अमोल मोरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक बापुसाहेब खंदारे, पोलीस हवालदार सतिश काळे, सुनिल कांबळे, वैभव भोसले, वैभव मोरे, विभीषण कुंटेवाड, तुकारम गुरव सचिन गावडे, समाधान लोखंडे यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

गुन्हयाचा तपास पोलीस अमलदार समाधान लोखंडे करत आहेत.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!