वानवडीत वाईन शॉप फोडून ६.७७ लाखांचा मुद्देमाल लांबवला…

वानवडीत वाईन शॉप फोडून ६.७७ लाखांचा मुद्देमाल लांबवला…

अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल.

वानवडीतील जगताप चौकात असलेले फ्रेंच वाईन शॉप अज्ञात चोरट्याने फोडून रोख रक्कमेसह ६ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​याबाबत परमेश्वर वैजनाथ येनकुर (वय ३१, महंमदवाडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

​वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०:३० ते १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान वानवडीतील जगताप चौकातील ‘फ्रेंच वाईन शॉप’मध्ये घडली. चोरट्याने दुकानाचे कुलूप आणि कडी कशाच्या तरी साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. दुकानातून ६ लाख ५२ हजार रुपयांची रोख रक्कम, १० हजार रुपये किमतीचे गोदरेज कंपनीचे लॉकर आणि १५ हजार रुपयांचा ‘HIKVISION’ कंपनीचा CCTV डीव्हीआर असा एकूण ६,७७,५०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लांबवला आहे.

​घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास डाबेराव, पोलीस उपनिरीक्षक सारिका शिर्के आणि पोलीस उपनिरीक्षक शेखर मोकाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
​या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर मोकाटे करत आहेत.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!