
कुटुंबीयांना आर्थिक मदत व बाधितांच्या उपचाराचा खर्च मनपाने उचलावा
It’s simple, just writing about your trips on a blog but you must make sure you installed FlatNews design for that blog.
मना न्युज नेटवर्क
हडपसर,
हडपसर परिसरातील विषारी व बनावट दारू प्रकरणामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी संबंधित भागाला भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी स्वाभिमानी महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा पल्लवी सुरसे यांच्या वतीने महापौरांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी नगरसेवक मारुती तुपे, स्वाभिमानी महिला संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी सुरसे, प्रशांत सुरसे, नगरसेवक पप्पू रोकडे, लखन काळे, अक्षय कुलकर्णी, नाना भिसे, चेतन जाधव उपस्थित होते.
निवेदनामध्ये बनावट दारू प्रकरणात मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व बाधितांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च पुणे महानगरपालिकेने उचलावा तसेच मृतांच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून कंत्राटी स्वरूपात रोजगार अथवा उपजीविकेसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना राबवावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी महापौर मंजुषा नागपुरे यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित मृत व बाधित कुटुंबांची संपूर्ण माहिती प्रशासनामार्फत मागवून घेणार असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक कुटुंबाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांना कोणत्या प्रकारची मदत करता येईल याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल व आवश्यक मदत जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

