हडपसरमध्ये ३९,७०० चौरस फुटांच्या पत्राशेडवर महापालिकेची कारवाई

हडपसरमध्ये ३९,७०० चौरस फुटांच्या पत्राशेडवर महापालिकेची कारवाई

हडपसर,  पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन १ कडून काळे बोराटे नगरमधील आदर्श नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक ५२ व ५७ येथे अनधिकृत पत्राशेड आणि दुकानांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत अंदाजे ३९ हजार ७०० चौरस फूट क्षेत्रावरील पत्राशेडचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली. हांडेवाडी रस्त्यावरील श्रीराम चौकातून महमदवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पत्राशेडवरही कारवाई करण्यात आली.

कारवाईचा तपशील :

– सर्व्हे क्रमांक ५२ व ५७ येथील अंदाजे २१ हजार ३०० चौरस फूट क्षेत्रावरील पत्राशेड व दुकाने.
– अंदाजे १८ हजार ४०० चौरस फूट क्षेत्रावरील पत्राशेड व दुकाने.
– एकूण अंदाजे ३९ हजार ७०० चौरस फूट क्षेत्र.

बांधकाम विभागाचे अभियंता अजिंक्य वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बांधकामांना यापूर्वी नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि बांधकाम विभागाच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारवाई पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती.

कारवाई सातत्याने होणार का?

शहरातील विनापरवाना बांधकामे आणि पत्राशेडबाबत महापालिकेकडून नियमानुसार कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, अशा मोहिमा सातत्याने राबवल्या जाणार का, तसेच संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रिया आणि नोटीस बजावण्याच्या नियमांचे पालन कसे केले जाते, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

 

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!