
येरवडा परिसरातील ताडीगुट्टा व विमा गार्डन येथील झोपड्यांवर कारवाई
Are the Pokemons only staying in your phone and game app? You will feel not sure after watching this funny videos.
पुणे :
पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने येरवडा परिसरातील ताडीगुट्टा आणि विमा गार्डन येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले असून अपात्र झोपडीधारकांविरुद्ध अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली.
महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पेठ येरवडा सर्वे क्रमांक १५२ येथील ताडीगुट्टा व विमा गार्डन परिसरातील झोपडपट्टी नदी पुनरुज्जीवन योजनेसाठी निवडण्यात आली आहे. योजनेअंतर्गत ५८ पात्र झोपडीधारकांचे सर्वे क्रमांक १७, खराडी तसेच शिंदे वस्ती हडपसर येथे पुनर्वसन करण्यात आले. त्याचबरोबर २१ अपात्र झोपडीधारकांविरुद्ध अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई परिमंडळ क्र. १ च्या उपआयुक्त श्रीमती आशा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश गुरव, कनिष्ठ अभियंता अजय मोरे, फारूक पटेल तसेच अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रमेश शेलार यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण निरीक्षक आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकांनी कारवाई केली.
कारवाईसाठी दोन पोकलेन, तीन जेसीबी, पंधरा डम्पर, गॅस कटर तसेच सुमारे ७० अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली.
महापालिकेच्या या कारवाईमुळे नदी पुनरुज्जीवन आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती मिळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

