
हडपसर भागात विजयादशमी उत्सव उत्साहात; दोन नगरांत ४१० स्वयंसेवकांचे पथसंचलन…
हडपसर,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने हडपसर भागात विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. हडपसर भागातील हडपसर नगर आणि चिंतामणी नगर या दोन नगरांमध्ये स्वतंत्रपणे निघालेल्या पथसंचलनात एकूण ४१० स्वयंसेवक सहभागी झाले होते.
हडपसर नगर : सकाळी ७ वाजता रामटेकडीतून संचलन….
हडपसर नगराचे पथसंचलन सोमवारी दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता रामटेकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथून सुरू झाले. रामटेकडी, ससाणे नगर, काळे बोराटे नगर, हडपसर गावठाण, वैदुवाडी, भोरीपडळ या परिसरातून हे संचलन मार्गस्थ झाले.
घोष पथकाच्या तालावर शिस्तबद्ध संचलन पाहून नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि रांगोळ्यांनी स्वागत केले. या संचलनात १५० स्वयंसेवक सहभागी झाले होते. यावेळी हडपसर नगराचे संघचालक गणेश वाघ आणि नगर कार्यवाह संतोष लडकत उपस्थित होते.
चिंतामणी नगर : सायंकाळी ६ वाजता हांडेवाडीतून संचलन…
चिंतामणी नगराचे पथसंचलन त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता हांडेवाडी येथील जय तुळजाभवानी मंगल कार्यालयातून सुरू झाले. हांडेवाडी चौक, डी मार्ट, मयूर पार्क, हांडेवाडी गाव विठ्ठल मंदिर, शौर्य वाडा हॉटेल, कानिफनाथ हॉटेल मार्गे पुन्हा तुळजाभवानी मंगल कार्यालय येथे समारोप झाला.
या संचलनात २६० स्वयंसेवक सहभागी झाले होते. संचलनानंतर शस्त्रपूजन आणि बौद्धिक कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमास चिंतामणी नगराचे संघचालक आशुतोषजी खांडेकर, नगर कार्यवाह अजिंक्य बडवे, हडपसर भाग कार्यवाह महेशजी रननवरे आणि भाग सह कार्यवाह दत्ताजी खेडेकर उपस्थित होते.
*

