सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हडपसर पोलिसांचे संचलन

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हडपसर पोलिसांचे संचलन

हडपसर : आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी हडपसर पोलिसांकडून पोलिसांचे संचलन करण्यात आले.

हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख रस्ते, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील परिसरातून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संचलन केले. सणासुदीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

या संचलनाची सुरुवात हडपसर गाडीतळ येथून झाली. त्यानंतर हडपसर गावठाण, पांढरे मळा, मगर आळी, गांधी चौक मार्गे सोलापूर रस्त्यापर्यंत पोलिसांचे संचलन करण्यात आले.

सणासुदीच्या काळात नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. तसेच संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा अनुचित प्रकार आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!