मगरपट्टा सिटी येथील भव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सव

मगरपट्टा सिटी येथील भव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सव

 

मना  न्युज नेटवर्क

हडपसर,

पुण्यपावन अधिक मास पर्वणीच्या निमित्ताने मगरपट्टा सिटी या ठिकाणी १८ ते २३ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेला ‘श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ’ महोत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत आणि मोठ्या उत्साहात पार पडला .

हभप शंकरराव मगर आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्या पुण्याईने तसेच किशोर मगर आणि महेश मगर यांच्या संयोजनातून या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .सलग सहा दिवस चाललेल्या या महोत्सवामुळे मगरपट्टा परिसरातील संपूर्ण वातावरण अत्यंत धर्ममय आणि भक्तिमय झाले होते. श्रीक्षेत्र आळंदी निवासी वेदमूर्ती हभप अनंत शास्त्री मुळे गोंदीकर यांनी या संगीतमय कथेचे वक्ते म्हणून प्रतिपादन केले.

या कथा प्रसंगामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि भगवती रुक्मिणी देवी यांच्या विवाहाचा भव्य दिव्य सोहळा सर्वांनी अत्यंत उत्साहात आणि आनंदाने साजरा केला या महोत्सवादरम्यान श्री महालक्ष्मी मंदिराचे अर्चक वेदमूर्ती धनंजय जी जोशी आणि संभाजीनगरहून आलेले वेदमूर्ती कृष्णकांत यांच्याद्वारे धार्मिक अनुष्ठान तसेच मूळ संहिता पारायणही विधीवत पार पडले.श्रीकृष्ण शिनगारे, रवी गंगणे आणि हरिभक्त परायण रामदास महाराज यांच्या संगीत साथीने या भक्तीमय वातावरणाला आणखीनच सुरेलता प्राप्त झाली होती .

या कथा महोत्सवाची सांगता प्रसंगी श्रीक्षेत्र दत्तधाम (नाशिक) येथील अधिकारी श्री दत्त दास जी महाराज यांचे शुभ आगमन झाले होते. 

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!