
माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेह ऋणानुबंध मेळावा
मना न्युज नेटवर्क
फुरसुंगी ,
येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दहावी १९९६ बॅच च्या वतीने माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेह ऋणानुबंध मेळावा रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी श्री शंभू महादेव संकुलाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, सरस्वती प्रतिमा व छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजन माजी मुख्याध्यापक छोटूलाल गुजर , माजी सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे माणिक बांगर, रामदास पांगारे , लक्ष्मण नामदास , दिलीप नेवसे, रमेश रासकर, प्रकाश शिरापुरे, उत्तरेश्वर पळशे,दिलीप इंगरे, विजय उंद्रे,अभिमन्यू सोनवणे,जयवंत भारती, दत्तात्रय शेवाळे व शाळेचे मुख्याध्यापक अनिल हरपळे यांच्या हस्ते झाले.
मेळाव्याच्या कार्यक्रमाची सुरुवात गेल्या व चालू वर्षातील माजी विद्यार्थी व शिक्षकांचे घरातील तथा स्नेही यांच्या दुखद निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शाळेची बेल झाल्यानंतर राष्ट्रगीत म्हणून सुरुवात झाली. या बॅचच्यावतीने सर्व उपस्थित माजी मुख्याध्यापक शिक्षकांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
यानंतर सर्व विद्यार्थ्यांची ओळख परेड व मनोगत झाले. सर्व विद्यार्थ्यांच्या मनोगतानंतर उपस्थित माजी शिक्षकांच्या वतीने माणिक बांगर यांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यासाठी अशोक राजिवडे, महेंद्र चंद, पांडुरंग गायकवाड, जितेंद्र देशमुख,महेश लेंडे, आबा मोडक, वंदना हरपळे, कौशल्या हरपळे, सुवर्णा कामठे, दिपाली टिकारे, वंदना सूर्यवंशी, रोहिणी लोणकर यांनी स्नेह ऋणानुबंध मेळावा सुव्यवस्थित होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले व परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व स्वागत महेंद्र चंद यांनी केले व आभार अशोक राजिवडे यांनी मानले. मेळाव्याची सांगता वंदेमातरम गीत घेऊन झाली.
