
प्रशांत जगताप व दीप्ती चवधरी यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती
मना न्यूज नेटवर्क
पुणे
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे , देशाचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी, खा. प्रियंका गांधी, राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ , पुणे शहर व जिल्हा प्रभारी सतेज (बंटी) पाटील , माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या मान्यतेने प्रशांत जगताप पुणे (पूर्व ) व दीप्ती चवधरी यांची पुणे (पश्चिम) शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
या समारंभाच्या निमित्ताने विश्वजीत कदम, प्रशांत जगताप, दीप्ती चवधरी यांनी पत्रकार सोबत संवाद साधला. पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, वाढती वाहतूक समस्या, प्रदूषण अशा असंख्य समस्यांनी पुणेकर हैराण आहेत, पुणे शहराच्या या दुरावस्थेला भारतीय जनता पक्षाची धोरणशून्य सत्ता कारणीभूत आहे. देशातील जनता महागाईने होरपळली जातेय, तरुणाई बेरोजगारीने पिचलाय, शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात भरडला जातोय. देशाचे पंतप्रधान मात्र परदेशात जाऊन चॉकलेट वाटण्यात मग्न आहेत. ही सर्व सत्य परिस्थिती जनतेपर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू हा निर्धार आज काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षांनी व्यक्त केला. तसेच, काँग्रेस नेतृत्वाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही जीवापाड मेहनत करू हा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
या पदग्रहण समारंभास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते गोपाल तिवारी, महानगरपालिकेतील गटनेते चंद्रकांत कदम, नगरसेविका दिपाली डोख, नगरसेविका सायरा शेख, नगरसेवक काशिफ सय्यद, मोहसीन शेख, मजहर मणियार, प्रवक्ते हनुमंत पवार, भाऊसाहेब आजबे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष स्वाती शिंदे, महेबूबभाई नदाफ, नगरसेवक रफिक शेख, नगरसेवक साहिल केदारी, स्वीकृत नगरसेवक सुनील शिंदे, नगरसेविका अश्विनी लांडगे, नगरसेविका वैशाली भालेराव, उस्मान तांबोळी, प्रदेश सरचिटणीस अमीर शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
