पुण्याचा आपला आयुक्त’ म्हणत आयुक्तांवर कौतुकाचा वर्षाव!

पुण्याचा आपला आयुक्त’ म्हणत आयुक्तांवर कौतुकाचा वर्षाव!

 

बालगंधर्व चौकात झळकले भव्य होर्डिंग; पुण्यात चर्चेला उधाण!

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या कार्याचे कौतुक करणारे भव्य होर्डिंग बालगंधर्व चौकात झळकले आहे.

‘पुण्याच्या संस्कृतीला साजेसा, पुण्याला आपलं घर मानणारा आणि पुणेकरांसाठी निर्मळ, निस्वार्थी मनाने झटणारा पुण्याचा आपला आयुक्त’ अशा शब्दांत या होर्डिंगवर त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

शहरात अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू असतानाच महापालिका आयुक्तांच्या कौतुकाचे हे होर्डिंग लक्षवेधी ठरत आहे.

हे होर्डिंग नेमके कोणी लावले, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!