‘महाराष्ट्र नामा’च्या बातमीचा इम्पॅक्ट; दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण

‘महाराष्ट्र नामा’च्या बातमीचा इम्पॅक्ट; दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण

 

दोन महिन्यांपूर्वीच्या पॅचवर्कच्या ठिकाणी पडला होता खड्डा; पाणीपुरवठा विभागाच्या ‘वॉश आउट’मुळे खडी-मुरूम वाहून गेल्याचे स्पष्ट

काळे-बोराटेनगर : न्हावलेवाडा चौकातील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘महाराष्ट्र नामा’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेतली. संबंधित ठिकाणी रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सदर ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी पॅचवर्क करण्यात आले होते. त्याच ठिकाणी पुन्हा खड्डा पडल्याने रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत या ठिकाणी पाणीपुरवठा विभागाची जलवाहिनी असून, विभागाकडून करण्यात आलेल्या ‘वॉश आउट’मुळे रस्त्याखालील खडी व मुरूम वाहून गेल्याने खड्डा पडल्याचे स्पष्ट झाले.

बातमीचा इम्पॅक्ट; अभियंत्यांची तत्काळ धाव

‘महाराष्ट्र नामा’ने हा प्रश्न नागरिकांच्या वतीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता संदीप दीपके यांनी तातडीने कार्यवाही केली. प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित ठिकाणची दुरुस्ती आज पूर्ण करण्यात आली.

त्यामुळे ‘महाराष्ट्र नामा’च्या बातमीचा इम्पॅक्ट’ पुन्हा एकदा पाहायला मिळाला असून, नागरिकांच्या समस्यांवर माध्यमांनी आवाज उठवल्यास प्रशासनाकडूनही तातडीने कार्यवाही होऊ शकते, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

नागरिकांना दिलासा

रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनचालकांना होणारा संभाव्य धोका लक्षात घेता तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण केल्याबद्दल नागरिकांकडून पथ विभागाचे आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यात पाणीपुरवठा विभागाच्या कामांनंतर रस्त्याचे नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!