हडपसर–वैदुवाडी मार्गावर अपघाताचा धोका; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

हडपसर–वैदुवाडी मार्गावर अपघाताचा धोका; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

हिंगणे मळ्यात कालव्यावरील रस्ता खचला

हडपसर : हिंगणे मळा परिसरात हडपसर ते वैदुवाडीकडे कालव्यावरून जाणाऱ्या काँक्रिट रस्त्याचा मोठा भाग खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, अपघाताची शक्यता वाढली आहे.

रस्त्याचा भाग खचल्याने वाहनांना मार्गक्रमण करताना अडचणी येत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी खचलेला भाग स्पष्ट दिसत नसल्याने दुचाकीस्वारांसाठी धोका वाढला आहे. या मार्गावर स्थानिक नागरिकांची नियमित वर्दळ असल्याने प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज आहे.

कायमस्वरूपी दुरुस्ती होईपर्यंत खचलेल्या भागाभोवती लोखंडी अडथळे उभारणे, धोक्याचे फलक लावणे, रात्री प्रकाशाची व्यवस्था करणे यासारख्या तात्पुरत्या उपाययोजना कराव्यात. त्यानंतर रस्ता खचण्याचे कारण शोधून तांत्रिक तपासणीच्या आधारे कायमस्वरूपी दुरुस्ती करावी.

रस्त्याची देखभाल कोणत्या विभागाच्या अखत्यारित आहे, हे स्पष्ट करून संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने विलंब न करता कार्यवाही करणे आवश्यक आहे.

स्थानिक नागरिक विलास हिंगणे, गिरीश हिंगणे, नवनाथ हिंगणे आणि नितीन आरु यांनी रस्त्याची तातडीने पाहणी करून सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!