काळेपडळ येथे डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

काळेपडळ येथे डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुणे,  पुण्यातील काळेपडळ परिसरात काल सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

काळेपडळ पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात राहेजा व्हिस्टा, टॉवर क्र. ७ जवळील महादेव मंदिर परिसरात घडला. दुचाकी (स्प्लेंडर) आणि डंपर (क्र. MH 12 VF 1965) यांच्यात धडक झाली. धडकेत दुचाकी डंपरच्या मागील चाकाखाली आली.

या अपघातात हमजा इब्राहिम सरकार (वय २०)* याचा जागीच मृत्यू झाला आहे, तर वसीम खान (वय २०) हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी डंपर चालक भगण्णा लक्ष्मण काटबू (वय ३४) याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

हडपसर, काळेपडळ, वैदुवाडी, ससाणेनगर परिसरात बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या डंपरची बेदरकार वाहतूक वाढली आहे. भर वस्तीत, शाळा-कॉलेजच्या वेळेत वेगाने डंपर चालवले जातात. कालव्यावरील रस्ते खचलेले असताना अशा जड वाहनांमुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
गेल्या ६ महिन्यातील हा ९ अपघात आहे

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!