मिसिंग लिंक’ बोगद्यात भीषण अपघात; युवा नेते तुषार भूमकर यांचा मृत्यू

मिसिंग लिंक’ बोगद्यात भीषण अपघात; युवा नेते तुषार भूमकर यांचा मृत्यू

पुणे, : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील युवा नेते तुषार भूमकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तुषार भूमकर हे आपल्या फॉर्च्युनर कारमधून पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.अपघात इतका गंभीर होता की त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते.या अपघातात कारमधील अन्य ३ ते ४ जण जखमी झाले असून त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.या दुर्घटनेमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात शोककळा पसरली असून तुषार भूमकर यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!