हडपसरमधील पांढरे मळा येथे विषारी दारूने घेतला सातवा बळी
Actually, I think this will happen to all pet lovers

हडपसरमधील पांढरे मळा येथे विषारी दारूने घेतला सातवा बळी

मना न्युज नेटवर्क

हडपसर,

येथील पांढरे मळा येथे विषारी दारूमुळे काल पर्यंत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आज सातवा बळी गेला आहे.. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सॅम्युअल लिंकन धैर्यम (वय ४९) हिंगणे चाळ,वीटभट्टी जवळ , ससाणेनगर,हडपसर याचे आज निधन झाले.हा विवाहित होता.
त्याला एक मुलगा असून तो अपंग आहे. त्याची पत्नी दारूच्या व्यसनामुळे त्याला ९ वर्षापासून सोडून गेली आहे.घरी विधवा आई ,अपंग मुलगा, असा परिवार होता.

मृत व्यक्तींनी परिसरातील दोन बेकायदेशीर दारूच्या अड्ड्यावर जाऊन दारू सेवन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दारू प्यायल्यानंतर संबंधितांना पोटदुखी, मळमळ आणि प्रकृती बिघडल्याचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला.

यशवंत रघुनाथ पवार (वय 62)रा. पांढरे मळा

अशोक रमेश चव्हाण( वय 52 वर्षे)  रा. सर्वे नंबर 311/ 27 लेन नंबर 15 ससाणे नगर,

राहुल शरद क्षीरसागर (वय 45 वर्षे) रा.पांढरे मळा सर्वे नंबर 257 हडपसर

विजय भूकुरलाल शर्मा (वय 45 वर्षे) रा. पांढरे मळा ससाणे नगर,

अरुण डाडर, (वय 60 वर्ष )रा. पांढरे मळा ससाणे नगर,

दत्तात्रेय माधवराव सूर्यवंशी (वय 55 वर्षे) रा. श्रीकृष्ण कॉम्प्लेक्स काळे कॉलनी जवळ ससाणे नगर यांचा मृत्यू झाला आहे.

 

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Disqus (0 )
error: Content is protected !!