हडपसरसह ससाणे नगर, काळे बोराटे नगरात कचऱ्याचे ढीग; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात,

हडपसरसह ससाणे नगर, काळे बोराटे नगरात कचऱ्याचे ढीग; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात,

हडपसर,

हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण हद्दीत स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. हडपसर, ससाणे नगर, काळे बोराटे नगर, सातव वाडी, गोंधळे नगर, गाडीतळ भागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून त्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.

यातील ससाणे नगर येथील डी-मार्ट जवळील मुख्य रस्त्यावरील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. हा भाग प्रभाग क्रमांक 16, बंटर शाळा आरोग्य कोठी अंतर्गत येतो. येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा उचलला गेला नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

आरोग्य कोठी मुकादम, आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक नेमके कोणते काम करतात, असा सवाल नागरिक *संदीप डांगमाळी* यांनी उपस्थित केला आहे.

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंड आणि सीसीटीव्हीची मागणी

जे नागरिक उघड्यावर कचरा टाकून जातात त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, अस्वच्छता करणे या कलमांअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून कोणी रस्त्यावर कचरा फेकणार नाही. तसेच पालिकेने ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिक *रणजित चव्हाण आणि मोहन बलाई* यांनी केली आहे.

24 आरोग्य कोठ्यांच्या मुकादमांची चौकशी करा

हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत एकूण 14 आरोग्य कोठ्या आहेत. त्यातील सर्व मुकादम आपल्या हद्दीत रोज सकाळी फिरून पाहणी करतात का? घरोघरी स्वच्छ मार्फत कचरा खरंच उचलला जातो का? याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी आणि त्याचा अहवाल जाहीर करण्यात यावा. दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी *हडपसर नागरिक कृती समितीचे रमजान शेख, महेश पवार, गणेश बोराटे* यांनी केली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!