हडपसरमधील पांढरे मळा येथे विषारी दारूचा कहर; सहा जणांचा मृत्यू

हडपसरमधील पांढरे मळा येथे विषारी दारूचा कहर; सहा जणांचा मृत्यू

मना  न्युज नेटवर्क
हडपसर,
येथील पांढरे मळा येथे विषारी दारूमुळे सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

 

 

मृत व्यक्तींनी परिसरातील दोन बेकायदेशीर दारूच्या अड्ड्यावर जाऊन दारू सेवन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दारू प्यायल्यानंतर संबंधितांना पोटदुखी, मळमळ आणि प्रकृती बिघडल्याचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला.

या मध्ये यशवंत रघुनाथ पवार (वय 62)रा. पांढरे मळा हे बिगारी काम करत असून सर्वात पहिला बळी यांचा गेला आहे. मात्र त्यांना दारुमुळे त्रास होतो हे समजले नसल्याने आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याने तू कशाने झाला हे समजले नव्हते.

अशोक रमेश चव्हाण( वय 52 वर्षे) रा. सर्वे नंबर 311/ 27 लेन नंबर 15 ससाणे नगर, राहुल शरद क्षीरसागर (वय 45 वर्षे) रा.पांढरे मळा सर्वे नंबर 257 हडपसर, विजय भूकुरलाल शर्मा (वय 45 वर्षे) रा. पांढरे मळा ससाणे नगर, अरुण डाडर, (वय 60 वर्ष )रा. पांढरे मळा ससाणे नगर, दत्तात्रेय माधवराव सूर्यवंशी (वय 55 वर्षे) रा. श्रीकृष्ण कॉम्प्लेक्स काळे कॉलनी जवळ ससाणे नगर यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर परिसरातील महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, पांढरे मळा परिसरात अनेक दिवसांपासून बेकायदेशीररित्या दारू विक्री सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबाबत वारंवार पोलिसांकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पोलीस केवळ तात्पुरती कारवाई करून निघून जातात आणि काही दिवसांत पुन्हा दारूचे अड्डे सुरू होतात. असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच काही पोलिसांकडून हप्ते घेतले जात असल्याचाही गंभीर आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. या निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप करत संबंधित यंत्रणा आणि बेकायदेशीर दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

“पुणे शहरातून बेकायदेशीर दारू विक्री पूर्णपणे बंद झाली पाहिजे. मुख्यमंत्री यांनी या गंभीर प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे.अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

हडपसर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणाऱ्या या बेकायदेशीर दारू अड्ड्यावर या पाच मयत व्यक्तींनी दारू सेवन केल्याचे त्यांच्या घरच्यांकडून समजले. पांढरे मळा येथील मधोमध असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ती दारू विक्री प्लास्टिकच्या पिशवीत केली जात होते. त्याचप्रमाणे मंत्री मार्केट येथेही असणाऱ्या दारू अड्ड्या वर हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणावर या बेकायदेशीर दारूची अनेक वर्षांपासून विक्री केली जात आहे

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!