
गुरुपौर्णिमेनिमित्त संत रविदास सामाजिक व सांस्कृतिक संस्थेत गुरु पूजन
हडपसर,
गुरुपौर्णिमेनिमित्त संत रविदास सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुरु पूजन, भक्तिगीते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास माजी नगरसेवक मारुती तुपे, नगरसेवक नितीन गावडे, संजय शिंदे, अध्यक्ष अक्षय आबनावे, अॅड. सचिन मांडले, निनाद टेमगिरे, बंडू आप्पा सोनवणे, सुनील चंद्रे, प्रीतम पाखरे, राजू कांबळे, अमोल जाधव, प्रशांत नवले, भगतसिंग कल्याणी, महेशभाऊ ससाणे, माणिकराव चव्हाण, अविनाश बनसोडे, हर्ष वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रशांतजी राठोड आणि श्रुतिका शिरसागर यांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
कार्यक्रमाच्या शेवटी संत रविदास सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष शामभाऊ टिंटोरे यांनी उपस्थित मान्यवर, नागरिक आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

