‘राष्ट्र प्रथम’ विचारातून व्यक्ती निर्माण; संघाच्या शताब्दीत विचारमंथन

‘राष्ट्र प्रथम’ विचारातून व्यक्ती निर्माण; संघाच्या शताब्दीत विचारमंथन

मना न्यूज नेटवर्क हडपसर , Rashtriya Swayamsevak Sangh संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त हडपसर येथे आयोजित ‘संघशताब्दी मंथन’ कार्यक्रमात संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा, विचारधारेचा आणि सामाजिक कार्याचा सखोल आढावा घेण्यात आला. “राष्ट्र प्रथम” ही भावना समाजात रुजवून व्यक्ती निर्माणातून राष्ट्र उभारणी करणे हेच संघाचे मुख्य ध्येय असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय प्रचार विभाग टोळीचे सदस्य Ajinkya Kulkarni यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत, हडपसर भागाच्या वतीने रविवारी हडपसर येथील Vitthalrao Tupe Auditorium येथे ‘संघशताब्दी मंथन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास संघाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, वकील, प्राध्यापक आणि समाजमाध्यम क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मनोज पोस्ट, हडपसर भाग संघचालक प्रवीण पाताळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अजिंक्य कुलकर्णी यांनी संघाच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेत संघाचे नेतृत्व, हिंदुत्वाची विचारधारा आणि शाखा पद्धती हे संघाचे तीन प्रमुख आधारस्तंभ असल्याचे सांगितले. “कुठल्याही संस्थेचे मूल्यमापन तिचे नेतृत्व, विचारसरणी आणि तळागाळातील कार्य यावरून होते. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुजी यांनी प्रसिद्धीपासून दूर राहत निरलस भावनेने संघटन उभारणीचे काम केले,” असे ते म्हणाले. “हा देश हिंदूंचा आहे आणि हिंदुत्वाच्या संघटनातून देशाला परमवैभवाकडे नेणे हीच संघाची स्पष्ट भूमिका आहे,” असे सांगत समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणून त्यांच्यात राष्ट्रीय दृष्टिकोन रुजविण्याचे काम संघाने गेल्या शतकभरात सातत्याने केले असल्याचे त्यांनी नमूद केले. संघाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘शाखा’ पद्धती असल्याचे स्पष्ट करत अजिंक्य कुलकर्णी म्हणाले, “शाखा हे केवळ एकत्र येण्याचे ठिकाण नाही; तर ती देश आणि समाजाबद्दल प्रेम निर्माण करणारी व्यक्ती घडविण्याची कार्यशाळा आहे.”वीज निर्मितीच्या ग्रीडचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, “वीज निर्मितीचे स्रोत वेगवेगळे असले तरी ग्रीडमध्ये आल्यानंतर तिचे स्वरूप एकच असते. त्याचप्रमाणे विविध राज्य, जाती आणि वर्गांतून आलेला स्वयंसेवक शाखेत आल्यानंतर सर्व भेद विसरून केवळ ‘भारतीय’ म्हणून एकत्र येतो.” मनोज पोस्ट यांनी संघ शताब्दी वर्षानिमित्त समाजात “पंच परिवर्तन” घडविण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण व संतुलन, स्वदेशी आचरण आणि नागरी कर्तव्य या पाच महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. “समाज परिवर्तनासाठी केवळ घोषणांनी चालत नाही; तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आचरणातून बदल घडवून आणणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी संघाच्या कार्यपद्धती, विचारधारा आणि समाजातील भूमिकेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. वक्त्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अनेक गैरसमज दूर करत संघाच्या कार्याचा उलगडा केला.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास हडपसर परिसरातील निवडक पत्रकार, वकील, प्राध्यापक, समाजमाध्यम प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील प्रबुद्ध नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश देशपांडे यांनी केले.संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून “व्यक्ती निर्माणातून राष्ट्रनिर्माण” हा संघाचा मूलभूत विचार पुन्हा अधोरेखित करण्यात आला.  

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!