तरुणीची उत्तुंग भरारी अमेरिकन कंपनीच्या एच आर मध्ये भारतात प्रथम

तरुणीची उत्तुंग भरारी अमेरिकन कंपनीच्या एच आर मध्ये भारतात प्रथम

हडपसर: पुण्यातील कल्याणी नगर भागामध्ये नामवंत अशी एक्सप्रेस आयटी मॅनपॉवर ग्रुप या कंपनीच्या एच आर डिपार्टमेंट मध्ये काम करणारी ऋतुजा कुंभार या मराठी मुलीने आपल्या कौशल्याने संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

अनेक उच्चशिक्षित मुला मुलींना आयटीमध्ये रोजगार देणाऱ्या एच आर डिपार्टमेंट मध्ये ऋतुजा काम करत असून या कंपनीचा विस्तार जगभरातील सुमारे 50 देशांमध्ये आहे.ही कंपनी संपूर्ण जगभरात मनुष्यबळ पुरवते यामध्ये आयटी इंजिनियर्स, असिस्टंट,सॉफ्टवेअर डेव्हलपर्स,आयटी एक्झिक्यूटिव्ह या स्वरूपामध्ये माहिती तंत्रज्ञानात ही कंपनी अव्वल असून ऋतुजा कुंभार व त्यांच्या टीम ने हे यश सहज शक्य केले आहे.जगभरात युद्धजन्य परिस्थिती असताना देखील या कंपनीच्या एच आर डिपार्टमेंटने जगभरात कुशल मनुष्यबळ कमीत कमी वेळात पुरवून हजारो तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

या योगदानाबद्दल एक्सप्रेस आयटी मॅनपॉवर ने ऋतुजा कुंभार यांचा अच्युवर्स ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित केले आहे. याबाबत बोलताना ऋतुजा कुंभार यांनी सांगितले की हे माझे यश नसून संपूर्ण टीमचे योगदान आहे व त्यांनी वरिष्ठांचे आभार व्यक्त केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!