युनिका सोसायटीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा,चित्र प्रदर्शन,

युनिका सोसायटीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा,चित्र प्रदर्शन,

मना न्युज नेटवर्क
हडपसर,
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थी,पालक आणि समाजातील व्यक्तींमध्ये पर्यावरण विषयक जागृती व्हावी.यासाठी युनिका सोसायटी सिनियर सिटीजन ग्रुपचे वतीने पर्यावरण पूरक चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सोनचाफ्याची रोपे लाऊन वृक्षारोपण करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे चित्रप्रदर्शन देखील सोसायटी क्लब हाऊस मध्ये भरवण्यात आले.चित्र काढताना मुले रंग आणि रेषांच्या अनोख्या दुनियेत हरवलेली दिसून येत होती. अनोख्या रंगतदार आणि निसर्गाच्या सानिध्यात चित्रकलेचा आनंद घेत होती.

या स्पर्धेत लहान गटांपासून इयत्ता दहावी पर्यंत एकूण साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.प्रा.सुरेश भोसले यांनी वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण या विषयावर विद्यार्थी आणि पालक यांना मार्गदर्शन केले.
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना

१) गड आणि किल्ले

२) निसर्ग चित्र

३) प्लॅस्टिक प्रदूषण

४) झाडे लावा, झाडे जगवा

५) पर्यावरण व जलसुरक्षा

६) स्पर्धा भारत,माझा भारत

७) समुद्र किनाऱ्यावरील दृश्य

असे विषय देण्यात आले.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कलाध्यापक भागूजी शिखरे यांनी काम पाहिले. यावेळी सर्व विद्यार्थी व पालक यांनी
पर्यावरण विषयी शपथ घेतली.
या कार्यक्रमाचे आयोजन युनिका सोसायटी सिनियर सिटीजन ग्रुपचे सदस्य भागूजी शिखरे,राजाराम पोतदार,भास्कर पाटील,मुकुंद भुतडा,शामसुंदर दरगड, विष्णू माळी, भरत पटेल, सुशीलकुमार वैद्य,शांताराम निकम, शशिकांत साळुंके,अशोक कुवळेकर,जयंत वझे,संजय शिंदे,रमेश कारंडे, सुनील ढमढेरे अशोक लोगांनी, बी.बी.पाटील यांनी केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!