दौंड तालुक्यातील खडकीच्या श्रावणी कुदळेची नीट परीक्षेत ऐतिहासिक कामगिरी

दौंड तालुक्यातील खडकीच्या श्रावणी कुदळेची नीट परीक्षेत ऐतिहासिक कामगिरी

दौंड : दौंड तालुक्यातील खडकी गावातील तसेच राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सौ. जयश्री कुदळे आणि श्री. कृष्णा कुदळे यांची कन्या श्रावणी कुदळे हिने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) मध्ये देशातील ओबीसी मुलींमध्ये प्रथम क्रमांक, ७१० पैकी ७१० गुण, महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आणि अखिल भारतीय (AIR) पाचवा क्रमांक मिळवत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.

जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या श्रावणीने सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळवले. शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवत तिने सेमी-इंग्रजी माध्यमातून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ग्रामीण भागातून शिक्षण घेत सर्वोच्च यश मिळवत तिने असंख्य विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

श्रावणीच्या या ऐतिहासिक यशामुळे दौंड तालुक्यातील खडकी गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुदळे परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रावणीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!