अन्न भेसळीचा सिलसिला थांबणार कधी ?

अन्न भेसळीचा सिलसिला थांबणार कधी ?

भारतामध्ये लोकशाही नांदते आहे ही लोकशाही आणि भारतीय राज्य प्रणाली ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारी आहे वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळे कायदे त्याचबरोबर काही विभागांना प्रतिबंधात्मक कायदे संविधानाच्या माध्यमातून सांगितलेले आहेत आणि त्यानुसार त्या ठिकाणी कार्यवाही चालते अलीकडच्या काळात पशुधन कमी झालेला आपणाला दिसून येत आहे महात्मा गांधींनी सांगितलं होतं खेड्याकडे चला खेड्याचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी हे वक्तव्य केलं होतं खेड्यामध्येच शेतकरी आपल्या शेतीतून आणि शेतीपूरक व्यवसायातून जे काही पिकवतो उत्पादन करतो त्याला त्याच ठिकाणी त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याच ठिकाणी त्याची उत्पादनक्षमता आणि आर्थिक स्थिती मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जावा अशी भूमिका महात्मा गांधी यांनी मांडली होती.

अलीकडच्या काळात अन्न औषधी इतर बाबीमध्ये भेसळ मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना दिसून येत आहे अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 हा त्यावेळी मंजूर झाला आणि जून 1955 पासून हा कायदा अमलात आला त्यानंतर 1994, 1976 ,1986, 2006, 2018 अशा विविध कालावधीत त्यामध्ये काही सुधारणा केल्या गेल्या आज देशांमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच पेट्रोल यासारखे इंधने त्याचबरोबर कडधान्य इतर धान्य दारू यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केल्याचे आढळून येत आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला अर्थात सर्वांच्याच धोका पोहोचत आहे.

अनेक प्रकरणांमध्ये दूध यापासून बनवलेले अनेक पदार्थ हे केमिकल युक्त आढळून येत आहे आणि या सर्व प्रकारामुळे आरोग्याला धोका पोहोचत आहे अनेक वेळा या भेसळयुक्त अन्नपदार्थ व इतर बाबीतून अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत या दुर्घटनांमधून हजारो लोकांचे प्राण गेलेले आहे आणि त्यांची कुटुंब उघड्यावर पडलेली आहेत हे सगळं उघड्या डोळ्यांनी सर्वांनाच अर्थात राज्यकर्ते प्रशासकीय अधिकारी आणि जनता यांना दिसत आहे परंतु त्यावर कारवाईचे कडक धोरण अवलंबविले जात नाही जेव्हा एखादी मोठी घटना घडते त्यावेळेस शासन प्रशासन जागं होतं आणि कारवाई करायला सुरुवात करते त्या अगोदर खूप काही घडून गेलेला असतं आणि थोड्या दिवस हे वातावरण चालतं पुन्हा जैसे थे परिस्थिती त्या ठिकाणी दिसून येते विशेषतः काही बाबी सर्वसामान्यांच्या मनात जे आहेत त्या अशा

अन्न व औषधी भेसळ प्रतिबंधक विभाग जागृततेने काम करताना दिसत नाही.
अनेक ठिकाणी दूध डेअरी मिठाईची दुकाने हॉटेल्स रस्त्यावरील खाद्यपदार्थाचे गाडी या सर्व बाबी जर पाहिल्या तर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भेसळ अस्वच्छता आणि सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ खेळणार वातावरण असतं ते सर्वांना दिसतं परंतु त्यावर काहीही केला जात नाही ही शोकांतिका आहे
वेगवेगळी कडधान्य, राईस त्याचबरोबर प्रक्रिया केलेले पदार्थ यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ आढळून येत आहे काही वेळा तर असं चित्र दिसतं उत्पादन कमी परंतु विक्री जास्त हे सूत्र कसं शक्य असेल यावरही विचार करायला पाहिजे याचा अर्थ नक्कीच भेसळ त्यामध्ये होत आहे जे नाहीच ते त्या ठिकाणी उपलब्ध होतं याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे अलीकडच्या काळात अंडे हे सुद्धा भेसळयुक्त केमिकल युक्त पद्धतीने बनविले जातात अगदी गहू ज्वारी सुद्धा हे बनवण्याचे अनेक प्रकार आपणाला दिसून येत आहे त्यामुळे याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं वाटतं.

कोल्ड्रिंक्स दारू बियर यासारखे द्रव्य पदार्थ सुद्धा केमिकल चा वापर करून डुप्लिकेट भेसळयुक्त बनविले जात आहे तसेच औषधी मध्ये सुद्धा भेसळ करून पेशंटच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे त्याचबरोबर डॉक्टर आणि औषधी दुकान यांचे लागेबांधे बऱ्याच वेळा असतात आणि त्यामुळे भेसळयुक्त औषधे देऊन रुग्णांची लुटमार केली जाते अनेक रुग्ण दगावले जातात आणि त्यातून अनेक दुर्दैवी घटना घडत आहे हे सर्व थांबवायचे असेल तर केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा अन्न औषधी भेसळ प्रतिबंधात्मक विभाग फार जोराने कार्यरत असला पाहिजे.

अलीकडेच या विभागाचे सचिव म्हणून ज्यांनी जबाबदारी घेतली आहे त्यांनी जे काही महाराष्ट्रामध्ये या विभागाच्या वतीने काम चालू केलेला आहे ते जनतेच्या मनावर राज्य करणार आहे कारण जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्यांना चाप बसला पाहिजे तेही कायदेशीर दृष्टिकोनातून त्यामुळे हे सगळं भेसळीचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल

एखाद्याने भेसळ केली आणि त्यामुळे काही घटना घडली तर त्या ठिकाणी त्याप्रकरणी तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत तात्काळ त्याच्यावर कारवाई होण गरजेच आहे आणि तो जो काही भेसळयुक्त आहे तो तात्काळ नष्ट केला पाहिजे जलद गती न्यायालयात अशी प्रकरण चालू सहा महिन्याच्या आत त्याला शिक्षा दंड जे काही असेल ते कठोरपणे झालं पाहिजे तरच हे सगळं थांबेल त्याचबरोबर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी खाबोगिरीला वेळीच चाप दिला पाहिजे जेणेकरून भ्रष्टाचार होणार नाही आणि दुर्घटना घडणार नाहीत आणि कोणाचही नुकसान होणार नाही त्यामुळे भेसळ थांबायला मदत होईल

लेखक
प्राचार्य डॉ. खुशाल मुंढे
जयवंतराव सावंत शिक्षणशास्त्र महाविद्यालय हडपसर पुणे 28
मोबाईल नंबर 98 22 22 62 15

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!