
पुण्याला कामासाठी गेलेले मजूर बेपत्ता; शोधासाठी पोलिसांचे आवाहन
दौंड : तालुक्यातील केडगाव येथील शेंडगेवस्ती परिसरातील रहिवासी तथा मजूर ज्ञानोबा शिवाजी मोरे (वय ५३) हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर क्रमांक ११०/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानोबा मोरे हे २२ तारखेला सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास “पुणे येथे कामासाठी जात आहे” असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र त्यानंतर ते परत घरी आले नाहीत. कुटुंबीयांनी नातेवाईक तसेच विविध ठिकाणी त्यांचा शोध घेतला; परंतु कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर यवत पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
ज्ञानोबा मोरे यांची उंची सुमारे ५ फूट ८ इंच असून रंग निमगोरा, शरीरयष्टी मध्यम आणि चेहरा गोल आहे. त्यांच्या कपाळावर जुन्या जखमेची खूण आहे. घरातून निघताना त्यांनी पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट आणि रंगीत पँट परिधान केली होती. ते मराठी व वडार भाषा बोलतात.
सदर वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळल्यास किंवा त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ यवत पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संपर्क
पोलीस उपनिरीक्षक किशोर वाघज : ८८८८२५२५५५
पोलीस हवालदार ए. एम. काळे : ८४०८०६२५२०
ज्ञानोबा मोरे यांचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन यवत पोलिसांकडून करण्यात आले आहे.बॉक्स आयटम :
बेपत्ता व्यक्तीचे वर्णन
• नाव : ज्ञानोबा शिवाजी मोरे
• वय : ५३ वर्षे
• उंची : ५ फूट ८ इंच
• रंग : निमगोरा
• विशेष खूण : कपाळावर जुन्या जखमेची खूण
• भाषा : मराठी, वडार
• पोशाख : पांढरा फुल शर्ट, रंगीत पँट
• शेवटचे दर्शन : पुण्यास कामासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले.

