
तरुणाई व्यसनांच्या विळख्यात….
तरुण म्हटलं की डोळ्यासमोर शरीराने सदृढ उंची रुबाबदार चेहरा आणि चेहऱ्यावर काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असं आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहतात या जगामध्ये सर्वात जास्त तरुण कुठे असेल तर आपल्या भारत देशात आहे आणि आपला भारत देश प्रगतशील देश म्हणून ओळखला जातो आणखी आपण प्रगत देशांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेलो नाहीत असं असताना आपल्यासमोर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहिलाय या व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाईचा विचार करण्यासारखी बाब आहे व्यसनाच्या प्रकारांचा जर विचार डोळ्यासमोर घेतला त्यामध्ये पहिला प्रकार येतो पदार्थाचे व्यसन आणि दुसरा प्रकार येतो क्रिया किंवा वर्तनाचे व्यसन पहिल्या प्रकारामध्ये तंबाखू दारू गुटखा सिगारेट हुक्का व्हाईट नर इत्यादी बाबी गणल्या जातात आणि दुसरा प्रकार क्रिया किंवा वर्तनाचा त्यामध्ये जुगार मटका लॉटरी मोबाईल सोशल मीडिया पॉर्न फिल्म पाहणे या सगळ्या बाबीचा विचार त्या ठिकाणी केला .
या तरुणाईच्या व्यसनाधीनते कडे अत्यंत गांभीर्यानं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि हे लक्ष केंद्रित करत असताना मुळातच व्यसन हा एक आजार आहे परंतु या आजाराची सुरुवात कोणत्याही व्यसनाच्या कमी प्रमाणात केली जाते. पदार्थाच्या व्यसनाची सुरुवात कधी 31 डिसेंबरच्या पार्टीच्या माध्यमातून कधी मित्राच्या आग्रहाखातर आणि हळूहळू ती चव आवडायला लागते विशिष्ट प्रमाणामध्ये सेवन करण्याची सवय लागते ते केल्यामुळे मेंदूला विशिष्ट पद्धतीचा आनंद मिळायला लागतो नंतर ती गोष्ट हवीहवीशी वाटत जाते आणि ती वाढत वाढत वाढते आणि नंतर त्याला आपण व्यसनी तरुण असं म्हणायला लागतो मग या सगळ्या गोष्टी सगळ्याच बाबीवर परिणाम करायला लागतात लहान वयातच व्यसनाधीनतेमध्ये शिरकाव होतो त्या कालावधीत कौटुंबिक जबाबदारी नसते आणि त्यामुळे व्यसनाकडं वाटचाल करताना तरुण मुक्तपणे करायला लागतो आपण काही व्यसनांच्या बाबतीमध्ये जे काही आपणाला सर्वसामान्यपणे दिसतं त्यावर आपण भाष्य करूया
दारू… खरंतर दारू हा शब्द उच्चारला की पुढे सर्वनाश होणार हे लक्षात येते हे लक्षात येत असताना सुद्धा तरुण त्याकडे आकर्षिला जातो परंतु हे आकर्षिला जाऊ नये किंवा त्या अगोदर भारतीय राज्यघटनेच्या कलम 47 नुसार मादक द्रव्य आरोग्यास अपायकारक बाबी या कोणालाही घेता येणार नाही अर्थात मुक्तपणे या सगळ्या गोष्टी मिळणार नाही करता येणार नाही असं सांगितले त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीने 17 ऑगस्ट 2011 रोजी दारूबंदी व्यसनमुक्ती धोरण अवलंबिवली त्यानुसार दारूबंदी व मध्य नियंत्रण कायदे बॉम्बे प्रोहिबिशन 1949 मध्ये उत्पादन विक्री वाहतूक सेवनावर नियंत्रण परवाना प्रणाली आणि शिक्षेची तरतूद या सगळ्या बाबी त्या ठिकाणी मांडल्या गेल्या त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्यास कलम 85 (1) ए बी व (2) अशा अस्तित्वात असलेल्या नियमानुसार कारवाई केली जाते तरीपण कितीही कायदे केले दारूबंदी विभाग चालू केला आज देशांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दारूबंदीची काय स्थिती आहे ते सर्वसामान्याला माहित आहे.
या व्यसनाधीनतेच्या बाबतीमध्ये वेगवेगळी संशोधने झाली त्यामध्ये व्यसन करणाऱ्या तरुण वयामध्ये आपणाला किती फरक जाणवतो हे लक्षात घेतलं पाहिजे 1950 ला सरासरी 23 वर्ष 1980 90 या कालावधीत वीस वर्ष 2014 मध्ये 17 वर्ष 2022 14 वर्ष या सगळ्या सरासरी वयोगटातील मुलं मुली जर दारूचे हुक्का ड्रग्स कोकेन क्रॅक गांजा या प्रकारची व्यसन करत असतील तर या देशाचं या राज्याचं भविष्य काय असेल याचा विचार न केलेलाच बरा जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार हे सगळे चित्र डोळ्यासमोर आलेला आहे त्याचा काहीतरी विचार केला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून काही राज्यांनी शंभर टक्के दारूबंदी केलेली आहे त्यामध्ये बिहार गुजरात मिझोरम नागालँड त्रिपुरा केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यामध्ये इतर राज्यापेक्षा काही अंशी जास्त दारू बंदी केल्याचं चित्र दिसून येत आहे या दारूला किंवा कोणत्याही व्यसनाला राज मान्यता कशामुळे मिळते अनेक नामवंत लेखक कलाकार राजकारणी अधिकारी प्रतिष्ठित माणसं सुद्धा दारू पितात आणि तो आदर्श या तरुणाई समोर उभा राहतो आणि शेवटी तो त्याकडे वळतोय या सगळ्या गोष्टीमुळे तरुणाई किती या व्यसनाच्या वेळाख्यात अडकलेली आहे हे लक्षात येतं
क्रॅक किंवा कोकेन हे दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या कोका वनस्पतीच्या पानापासून बनलेलं असतं याचा तर थेट मेंदूवर परिणाम होतो हे वापरताना तरुण नाकाद्वारे उडतात इंजेक्शन घेतात काहीजण दाताच्या हिरड्यावर ठेवतात तर काही धूर करून बंद खोलीमध्ये ते ओढतात खूप भयानक चित्र आहे वेगवेगळ्या व्यसनांचं या सगळ्या व्यसनाचे दुष्परिणाम प्रामुख्याने हृदयाचे ठोके वाढतात रक्तदाब वाढतो हृदयाच्या विकाराचा झटका येऊ शकतो मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो त्याचबरोबर मानसिक दुष्परिणामांमध्ये चिंता भीती नैराश्य संशय चिडचिडपणा निर्णय क्षमता ढासळणे या सगळ्या बाबी आपणाला त्या व्यसनी तरुणांमध्ये दिसून येतात यावर उपाय जर कोणता असेल तर फार महत्त्वाचा समुपदेशन करणे आणि वैद्यकीय उपचार करणे याशिवाय दुसरा उपाय त्या ठिकाणी दिसूनच येत नाही यापुढे जाऊन पाहिलं तर त्या तरुणाची विचारशक्ती कमी होते. नातीगोती कमकुवत होतात शारीरिक समस्या वाढतात वास्तवापासून दूर जातो. निकोटीन सारख्या घातक पदार्थातून रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि अनेक व्याधी निर्माण होतात या सगळ्या पदार्थाच्या माध्यमातून केलं जाणाऱ्या व्यसनाच्या बाबतीमध्ये विचारपूर्वक तरुणाईंना विचार केला पाहिजे पालकांनी विचार केला पाहिजे आणि सिस्टमने एक चांगलं धोरण आखून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली पाहिजे असं मला वाटतं
व्यसनाचा दुसरा प्रकार म्हणजे क्रिया आणि वर्तनाचे व्यसन त्यामध्ये काही तरुणांना जुगार मटका लॉटरी मोबाईल गेम सोशल मीडियाचा अतिवापर करणे पॉर्न फिल्म पाहणे या व्यसनाच्या आहारी अनेक करून गेलेले दिसून येत आहे अगदी रात्र आणि दिवस त्यांना त्या व्यसनाच्या साठी पुरत नाहीत आयुष्य देशोधडीला लागतं दिवाळखोरी होते ना इधर काना उदर का अशी परिस्थिती त्या व्यक्तीची होते कंगालपती होतो आणि शेवटी रस्त्यावर येतो ज्या महलाचा ज्या प्रॉपर्टीचा तो मालक असतो त्या ठिकाणी या व्यसनामुळे तो मजूर म्हणून सफाई कामगार म्हणून काम करायला लागतो ते फक्त या व्यसनामुळे म्हणून तरुणांनो व्यसन करायचे की नाही हे तुम्ही ठरवा आयुष्य जीवन घडवायचं असेल तर व्यसनाकडे वळू नका. व्यसनाला बाजूला फेका आणि ताठ मानेने आपलं जे भविष्य ते घडवण्यासाठी तत्पर राहा अलीकडच्या काळात या व्यसनाबरोबरच डिजिटल व्यसन खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाईला लागलेला आहे अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत तो मोबाईल तो लॅपटॉप त्यांच्या हातून बाजूला होत नाही झोपले तरी बाजूलाच या सगळ्या गोष्टी असतात रात्री अचानक जाग आली तर त्या गोष्टी हात लावून पाहतात की हे माझ्याजवळ आहे का म्हणजे एवढं भयानक व्यसन आजच्या तरुणाईला त्या ठिकाणी लागलेला दिसून येत आहे.
या डिजिटल व्यसनामुळे त्या तरुणांमध्ये काय लक्ष न दिसतात ती अशी सतत फोन तपासणी वेळेचे भान नसणे स्वभावामध्ये चिडचिड डोळे मान पाठ यावर ताण येणे जर हे डिजिटल व्यसन आपणाला थांबवायचं असेल तर त्या ठिकाणी डिजिटल डिटॉक्स अवलंबविले पाहिजे डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय तर डिजिटल साधनांचा नियंत्रित वापर करणे किंवा दिवसातून काही कालावधी ठरवून त्याचा वापर टाळणे होय आणि या डिजिटल डिटॉक्सचा उपयोग केला तर तरुणांमध्ये हे बदल घडून येतील एकाग्रता स्मरणशक्ती वाढेल प्रत्यक्ष संवाद कौशल्य विकसित होईल मानसिक आरोग्य सुधारेल आत्म नियंत्रणाची सवय लागेल शिकण्याची गुणवत्ता वाढेल या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर डिजिटल व्यसनापासून दूर जाण्यासाठी डिजिटल डिटॉक्स खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडेल तरुणांनो लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी अंगी करा आपल्यामध्ये बदल घडवून आणा आणि व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपली आपणच शोधा एवढेच तुम्हाला मी या निमित्ताने सांगतो
आज मोठ्या मोठ्या शहरांमध्ये पार्ट्या होतात तरुण पब मध्ये डान्स बार मध्ये जातायेत त्या ठिकाणी त्यांना सहजपणे सगळ्या गोष्टी मिळतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याहीपेक्षा पुढचं ज्ञान ते प्राप्त करतायेत आज मुलं मुली असं वेगळं बोलण्याचं चित्र दिसत नाही मुलगा असो मुलगी असो ती या सगळ्या गोष्टीकडे वळलेली दिसून येत आहे परंतु हे वळण घेण्याअगोदर तरुणाईने आपल्या आई-वडिलांचा गुरुजनांचा विचार केला पाहिजे आपल्याला दिलेल्या संस्काराचा विचार केला पाहिजे आपण कुठेतरी दिलेले संस्कार मोडीत काढायला निघालोय का हा विचार तरुण-तरुणींनी केला पाहिजे पालकांनी सुद्धा आपल्या 14 वर्षापुढील मुला मुलींकडे थोडा वेळ काढून लक्ष दिले पाहिजे त्यांच्याशी कधीतरी संवाद साधला पाहिजे मित्र रुपी संवाद साधला पाहिजे. एक आपण त्यांचे कोणीतरी जवळचे आहोत की जे की त्यांच्याजवळ आपण व्यक्त झालं पाहिजे असं त्यांना वाटलं तर खूप चित्र वेगळं पाहायला मिळेल.
त्याचबरोबर प्रशासनाच्या माध्यमातून तरुणांना व्यसनाच्या आहारी न जाण्यासाठी मोफत समुपदेशन केंद्र उभारून शाळा महाविद्यालयातून कमीत कमी आठवड्यातून एक दिवस त्या लहान मुलांना सुद्धा या दुष्परिणामाच्या बाबतीमध्ये सांगितलं गेलं पाहिजे त्यांच्याशी संवाद साधला गेला पाहिजे आणि त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे जेणेकरून लहानपणापासूनच व्यसन किती भयानक असतं व्यसन आपणाला किती वेगळ्या मार्गावर घेऊन जातो.
आपलं आयुष्याचं नुकसान व्यसनामुळे होतं हे त्या बालकाच्या लक्षात आणून देण्याचं काम त्या त्या वयामध्ये केलं तर तरुण वयामध्ये काही प्रमाणात का होईना व्यसनाधीनतेकडे ओढा घेतलेली तरुण मंडळी माघारी फिरेल असं वाटतं त्यामुळे तरुणांनो तरुणींनो तुम्ही या देशाचे आधारस्तंभ आहात भविष्यात तुमच्या हाती हा देश भविष्यात असणारे आज आमचं सर्व काही झालं तुमच्यासाठी आम्ही भरपूर काही केलं परंतु तुम्हाला भविष्य खडतरपणे जगायचंय की आनंदात जगायचे याचा विचार तुम्ही करायचा आम्ही तुम्हाला योग्य मार्ग दाखवतोय त्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर तुमचं भविष्य खूप उज्वल असेल मार्ग चुकला तर तुमचं भविष्य अंधकारमय असेल एवढं लक्षात ठेवा आणि तरुणांनो तरुणींनो व्यसनाधीनतेकडे वळू नका एवढीच कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी हा माझा शब्द प्रपंच थांबवतो.
लेखक
प्राचार्य डॉ खुशाल लिंबराज मुंढे
शिक्षणतज्ञ, समुपदेशक
जे एस पी एम संचलित
जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन हडपसर पुणे 28
मोबाईल 98 22 22 62 15

