
उंड्री-मंतरवाडी मुख्य रस्त्यावर तुटलेल्या चेंबरच्या झाकणामुळे अपघाताचा धोका
उंड्री : उंड्री-मंतरवाडी मुख्य रस्त्यावर मैलापाणी वाहून नेणाऱ्या चेंबरचे झाकण तुटलेल्या अवस्थेत असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांकडून चेंबर तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
स्थानिक रहिवासी सुभाष घुले यांनी प्रशासनाकडे ही मागणी केली असून, संबंधित विभागाने तातडीने चेंबरचे तुटलेले झाकण दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय आणि संभाव्य अपघाताचा धोका दूर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी तुटलेले चेंबर वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास अपघात होण्याची शक्यता असल्याने, प्रशासनाने विलंब न करता या समस्येवर उपाययोजना करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

