महंमदवाडीत कोयता गँगची दहशत? कडक कारवाईची मागणी;  प्रमोद भानगिरे

महंमदवाडीत कोयता गँगची दहशत? कडक कारवाईची मागणी; प्रमोद भानगिरे

रहेजा चौक, ट्रिबिका हायस्ट्रीट परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचा दावा; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

पुणे :

महंमदवाडीतील रहेजा चौक, ट्रिबिका हायस्ट्रीट तसेच परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये हातात कोयते घेऊन काही तरुणांकडून दहशत माजविली जात असल्याचा आरोप करत शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांनी पोलिस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा करत संबंधितांवर तातडीने कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.

भानगिरे म्हणाले, “कायद्याचा धाक राहिला पाहिजे. भरवस्तीत उघडपणे शस्त्रांचे प्रदर्शन करून दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. नागरिकांना सुरक्षित वातावरण देणे ही पोलिस प्रशासनाची जबाबदारी आहे.”

महंमदवाडी परिसरात सातत्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप करत त्यांनी पोलीस आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी केली. कारवाईत दिरंगाई झाल्यास शिवसेना पोलीस आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

पुणे शहरात पोलिसांचा धाक उरला नाही…!

कारवाई करणारे पोलीस फक्त चमकोगिरी करत आहेत का ?
महंमदवाडी येथील रहेजा चौक, ट्रिबिका हायस्ट्रीट परिसर तसेच अनेक सोसायट्यांमध्ये नागरिक भीतीने जगत आहेत . पोलीस आयुक्त जरा इकडे लक्ष द्या . या गुंडांची ही दहशत बघा. जर यांच्यावर कडक कारवाई केली नाही . यांचा बंदोबस्त केला नाही तर पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडावा लागेल. नागरिकांनी सुरक्षित जगणे त्याचा अधिकार आहे . यांच्यावर कधी कारवाई करणार ? हातात कोयते घेवून हे दहशत करतात यांच्यावर जरब बसवा! अन्यथा शिवसेना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम आहे !

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!