मिनी स्कूल बसची दुचाकीला धडक; 16 वर्षीय भावाचा मृत्यू, बहीण गंभीर

मिनी स्कूल बसची दुचाकीला धडक; 16 वर्षीय भावाचा मृत्यू, बहीण गंभीर

पुणे: राष्ट्रीय युद्ध स्मारक (वॉर मेमोरियल) चौकात भरधाव मिनी स्कूल बसने दुचाकीला समोरून धडक दिल्याने भाऊ-बहीण गंभीर जखमी झाले. या अपघातात 16 वर्षीय रोहित लक्ष्मण कुदळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याची बहीण रिया लक्ष्मण कुदळे (18) हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा अपघात बुधवारी सकाळी सुमारे साडेसात वाजता वानवडी पोलिस स्टेशन हद्दीत घडला. वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिया कुदळे स्कूटर चालवत होती, तर भाऊ रोहित मागे बसला होता. दोघे वॉर मेमोरियल चौकात आले असताना भरधाव आलेल्या मिनी स्कूल बसने त्यांच्या अ‍ॅक्टिव्हाला धडक दिली.

*आरोपी चालक:* दत्तात्रय बसवराज सागर (वय 26, रा. महादेव नगर, मांजरी रोड, हडपसर) याच्यावर वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवल्याचा आरोप आहे.

रिया कुदळे हिच्या तक्रारीवरून वानवडी पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!