
भाजप ओबीसी महिला आघाडीच्या अध्यक्षपदी दिपाली माटे
आमदार योगेश टिळेकर व पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
हडपसर,
हडपसर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सौ. दिपालीताई पांडुरंग माटे यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार श्री. योगेश अण्णासाहेब टिळेकर तसेच पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या नियुक्तीमुळे हडपसर परिसरातील महिला संघटनात्मक कार्याला नवे बळ मिळणार असल्याची भावना भाजपा कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग, महिलांमध्ये असलेला संपर्क आणि पक्षनिष्ठा लक्षात घेऊन दिपाली माटे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिपाली माटे यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देत, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. पुढील वाटचाल आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी नगरसेविका रंजनाताई ऊर्फ नानी टिळेकर, नगरसेविका सौ. उज्वलाताई जंगले, नगरसेवक मारुती आबा तुपे, अॅड. कृष्णा पांडुरंग माटे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
