पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची बारा वर्ष… एक दृष्टिक्षेप

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची बारा वर्ष… एक दृष्टिक्षेप

भारतीय लोकशाही जगामध्ये एक नावलौकिक मिळविणारी आहे आणि या भारत देशाचे अनेक पंतप्रधान होऊन गेले अनेक पंतप्रधानांनी देशाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले अगदी या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते आजचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यापर्यंत जर आपण भारतीय आहोत या दृष्टिकोनातून दृष्टिक्षेप टाकला तर नक्कीच या देशाचे आजचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जगामध्ये भारताची मान सन्मानाने उंच केलेली दिसून येत आहे 2014 पासून सन्माननीय पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी काम पाहत आहेत.

आज त्यांना बारा वर्ष पूर्ण होत आहेत या बारा वर्षाच्या तपामध्ये नरेंद्रजी मोदी यांनी अनेक घोषणा वेगवेगळ्या समाज घटकाच्या उन्नतीसाठी देशाच्या विविध क्षेत्रातील विकासासाठी तयार केल्या घोषित केल्या आणि त्या योजनांची अंमलबजावणी अत्यंत चोखपणे करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसून येत आहे स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी गरिबी हटाव चा नारा दिला आणि त्या नाऱ्याला साजेस काम त्यांच्या हातून झालं म्हणून त्यांच्यासोबत गोरगरीब दीनदलित मुस्लिम ओबीसी मागासवर्गीय हे घटक खंबीरपणे उभे राहिले होते.

त्यामुळे त्यांनी काही काळ सत्ता गाजविली परंतु परिस्थिती बदलत असते त्या परिस्थितीच्या अनुषंगाने निर्णय घ्यावे लागतात देशातला प्रत्येक नागरिक अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांपासून दूर झाला नाही पाहिजे त्या अनुषंगाने सध्याचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी काम करण्याचा धोरण आपलं गाव खेड्यामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि इतर देशासोबत भारतीय नागरिक स्पर्धेसाठी तयार झाला पाहिजे या दृष्टिकोनातून अनेक योजना त्यांनी राबविल्या त्यामध्ये सर्वांना माहीत असणाऱ्या स्टार्ट अप इंडिया, डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी स्मार्ट इंडिया ,अग्नीपथ रक्षा नीती सुधार योजना, पीएम अशा योजना, स्वामित्व योजना, कोविड सुरक्षा योजना, कौशल्य विकास ग्रामीण योजना, एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजना, पीएम पोषण आहार योजना, राष्ट्रीय वस्त्र निर्मिती योजना, पीएम अशा योजना, परिवहन विभाग योजना, इथेनॉल पासून पेट्रोल निर्मिती योजना, यासारख्या अनेक योजना मोदी सरकारच्या माध्यमातून सुरू झाल्या चांगल्या पद्धतीने त्याचं काम चालत आहे आणि त्यामुळे देश विकासाला देशाच्या नागरिकाच्या विकासाला चालना मिळत आहे.

मोदी सरकार यांच्याकडे सरकार म्हणून ज्यावेळेस सामान्य नागरिक पाहतो त्यावेळेस एक आशा असते की या मोदी सरकारमुळे मोदी सरकारच्या कणखर भूमिकेमुळे माझ्या देशाकडे आजूबाजूचा कोणताही देश वाकड्या नजरेने पाहू शकत नाही आणि त्यामुळेच आम्ही या देशात सुरक्षित आहोत ही भावना प्रामुख्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये दिसून येते दुसरी बाब आहे पीएम पोषण आहाराच्या माध्यमातून बालके असतील किंवा गोरगरीब ग्रामीण भागातला नागरिक असेल या सर्वांना त्याच्या पोटाला अन्न मिळावं या भूमिकेतून मोफत अन्नधान्य त्या ठिकाणी पुरविले जाते एवढेच नाही ग्रामीण भागामध्ये पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून दळणवळणाची साधनं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हावी त्या दृष्टिकोनातून रस्ते बांधणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे.

ग्रामीण भागात च सोडा परंतु शहरी भाग मोठी मोठी शहर एकमेकाला समृद्धी महामार्गाच्या दृष्टिकोनातून जोडली गेलेली आहेत आज मोदी साहेबांचं जे काही डिजिटल इंडिया चा स्वप्न आहे ते स्वप्नसुद्धा साकार झाल्याचे दिसून येत आहे कारण ग्रामीण भागातला शेतकरी शेतमजूर कष्टकरी दिन दलित सुद्धा आज डिजिटल इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट ऑनलाइन डिजिटलायझेशन च्या माध्यमातून करत आहे खरंच एक काळ होता खेड्यामध्ये रस्ते नव्हते वीज नव्हती पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा नव्हती या सगळ्या गोष्टी आज आपणाला प्रत्येक खेड्यामध्ये दिसून येत आहेत हे सगळं चित्र बदलण्याची धमक या मोदी सरकारमध्ये दिसून येत आहे मोदी सरकार अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे अलीकडेच परिस्थितीनुसार शिक्षण क्षेत्रामध्ये नाविन्य बदल घडवून आणण्याचा प्रयत्न या मोदी सरकारच्या माध्यमातून केला जात आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 च्या माध्यमातून आज शिक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन बदल आपणाला घडून येत असताना दिसत आहेत ग्रामीण भागामध्ये सुद्धा डिजिटल एज्युकेशन त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

खाजगी गुंतवणूकदारांना शिक्षण क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याची संधी त्या ठिकाणी दिली जात आहे आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण बदल घडवून त्या ठिकाणी क्रांती करण्याचा प्रयत्न मोदी सरकारच्या माध्यमातून केला जात आहे परंतु हा प्रयत्न करत असताना मोदी सरकारने या क्षेत्राकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे कारण एखाद्या देशाला जर अधोगतीकडे न्यायचं असेल खाली खेचायचं असेल तर त्या ठिकाणी प्रथम शिक्षणाक्षेत्र खिळखिळे केले जाते परंतु अशा पद्धतीची भूमिका शिक्षण क्षेत्रामध्ये अंमलबजावणी करताना आपणाला कोणाची दिसून आली तर त्याच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे आणि शिक्षण क्षेत्र पारदर्शक निर्मळ आणि उन्नतीकडे वाटचाल करणारच राहिलं पाहिजे या शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य प्रत्येकानं राखलं पाहिजे.

मोदी सरकारच्या माध्यमातून देशाच्या रक्षणासाठी तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न अग्निवीर च्या माध्यमातून केला गेला आजही ते करत आहे या देशाच्या रक्षणासाठी तरुणांनी पुढे आलं पाहिजे ज्या वयामध्ये तरुणांमध्ये एक देश प्रेम भावना प्रखरपणे दिसून येते त्याच कालावधी देशा संरक्षण करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली पाहिजे या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे या तरुणांनी आपण जन्माला आलो परंतु देशासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी मात्र भूमी विषयी प्रेम निर्माण व्हावं देशाविषयी प्रेम निर्माण व्हावे या भूमिकेतून देशाची रक्षा करण्याची जबाबदारी या तरुण अग्निविरावर मोदी सरकारने दिलेली आहे ठराविक काळानंतर तो तरुण पुन्हा समाजामध्ये वावरणार परंतु वावरत असताना तो प्रत्येक काम करत असताना स्वतःच्या मनामध्ये देशाभिमान ठेवूनच करेल हीच भूमिका या योजनेची दिसून येते.

त्याचबरोबर नवतरुण उद्योजक बनावे त म्हणून त्यांनी या तरुणांना उद्योग धंद्यासाठी स्टार्ट अप इंडिया च्या माध्यमातून ट्रेनिंग देऊन त्यांना स्वतःच्या अंगी कौशल्य निर्माण करण्याची संधी दिली आहे त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकांकडून योग्य त्या पद्धतीचा पतपुरवठा या तरुण उद्योजकांना कमी व्याजदरात कसा होईल कसा करता येईल या भूमिकेतूनही प्रयत्न केलेले आहेत शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांसाठी अनेक योजना मोदी सरकारच्या माध्यमातून राबविल्या गेलेल्या आहेत आज शेतकरी फळबागाकडे वळलेला आहे.

आज शेतकरी शेतीपूरक व्यवसायाकडे वळलेला आहे त्याला पाठबळ देण्याचे काम मोदी सरकारच्या माध्यमातून केलं जातंय वातावरणातील बदलामुळे शेती व्यवसायावर काही गंडांतर आलं तर त्यासाठी सुद्धा इन्शुरन्स ची व्यवस्था मोदी सरकारच्या माध्यमातून केलेली आहे स्त्रियांच्या विकासासाठी महिलांच्या विकासासाठी मोदी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना या ठिकाणी राबविल्या जात आहेत प्रोत्साहन पर भत्ते दिले जात आहे आणि महिला सक्षम झाली पाहिजे या भूमिकेतून मोदी सरकारच्या माध्यमातून काम केलं जाते.

मोदी सरकारच्या माध्यमातून या देशांमधल्या शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांना या देशातल्या महिलांना या देशातल्या तरुणांना त्यांच्या हाताला काम देऊन विकासाकडं नेण्याचा प्रयत्न केला जातो ही फार अभिनंदनची बाब आहे परंतु मोदी सरकारच्या माध्यमातून आणखी तीव्रतेने या सगळ्या गोष्टीवर प्रयत्न करणं गरजेचं वाटतं जनसामान्या मधला मोदी सरकारवर विषयीचा विश्वास जर तेवढ्याच पद्धतीने राहायचं असेल तर मोदी सरकारमधील प्रत्येक सदस्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले पाहिजे मोदी सरकारची ही 12 वर्ष कधी गेली ती कळली नाहीत या देशाचा प्रत्येक नागरिक आज सुरक्षित आहे.

तो मोदी सरकारमुळे या प्रत्येकाच्या मनामध्ये देशप्रेम तेवढ्याच प्रभावीपणे राहील आणि थोड्या बहुत प्रमाणामध्ये या मोदी सरकारकडून बेरोजगारांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आणखी काही करता येते का? शिक्षण क्षेत्रामध्ये बदल करताना शाश्वत बदल कसा करता येईल याकडे अत्यंत चाणाक्षपणे लक्ष देऊन ते केलं पाहिजे या बारा वर्षाच्या कालावधीत अनेक संकट या देशावर येऊन गेली त्या संकटावर मात करण्यासाठी मोदी सरकारने अत्यंत प्रभावीपणे काम केलं त्याबद्दल या देशाचा नागरिक म्हणून मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि मनःपूर्वक धन्यवाद ही म्हणतो पुढच्या कालावधीसाठी विकासात्मक वाटचालीसाठी सुदृढ आरोग्यासाठी या मोदी सरकारला मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!

लेखक

प्राचार्य डॉ.खुशाल लिंबराज मुंढे
शिक्षणतज्ञ
तथा
शैक्षणिक सामाजिक राजकीय चळवळीचे अभ्यासक
मोबाईल नंबर 98 22 22 62 15

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!