
राहेजा व्हिस्टा सर्कलवर पुन्हा अपघात; भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर
पुणे: मोहम्मदवाडीतील राहेजा व्हिस्टा सर्कल येथे भरधाव कारने दुचाकीला उडवल्याने एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.राहेजा व्हिस्टा सर्कलजवळ अतिवेगात असलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.कार अतिशय वेगात होती, नियंत्रण सुटल्याने थेट दुचाकीला धडक बसली. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती.राहेजा व्हिस्टा सर्कल हा अपघातप्रवण स्पॉट बनला आहे. याच ठिकाणी यापूर्वीही वारंवार अपघात झाले आहेत. गतिरोधक नाहीत, सिग्नल नाहीत, त्यामुळे अपघात वाढले आहेत.पुणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने या सर्कलवर स्पीड ब्रेकर, सिग्नल आणि सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

