थुंकल्याच्या कारणावरून वाद; तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला

थुंकल्याच्या कारणावरून वाद; तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला

लोकमत न्युज नेटवर्क

हडपसर : थुंकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाला शिवीगाळ करून हाताने मारहाण केल्याचा, तसेच लोखंडी हत्याराने पायावर व पाठीवर आणि फायटरने नाकावर मारहाण केल्याचा प्रकार केशवनगर येथे घडला. याप्रकरणी सात जणांविरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास हनुमान मंदिराजवळील गल्ली, केशवनगर, मुंढवा येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी सुरज कैलास कांबळे (वय २१, व्यवसाय) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी क्रमांक एक याच्यासोबत थुंकल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी व त्याचा मित्र विशाल रणदिवे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर हाताने मारहाण करण्यात आली. आरोपींपैकी कोणीतरी लोखंडी हत्याराच्या उलट्या बाजूने फिर्यादीच्या डाव्या पायाच्या मांडीवर तसेच विशाल रणदिवे यांच्या पाठीवर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच फायटरने फिर्यादीच्या नाकावर मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी कृष्णा गायकवाड, समक्ष जाधव, आदित्य गायकवाड, अथर्व जाधव, नैतिक जाधव, ओम गडदे आणि दक्ष जाधव यांच्याविरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंढवा पोलिस करीत आहेत.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!