‘रिसर्च कॉम्पेन्डिअम’या शोधनिबंध संग्रहाचे प्रकाशन

‘रिसर्च कॉम्पेन्डिअम’या शोधनिबंध संग्रहाचे प्रकाशन

मना न्यूज नेटवर्क
हडपसर,

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांच्या हस्ते ‘रिसर्च कॉम्पेन्डिअम’ या शोधनिबंध संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

या संग्रहात महाविद्यालयातील संशोधक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी २०२५ या वर्षांत विविध आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधन लेखांचे (Research Paper) संकलन या मध्ये केले आहे. महाविद्यालयातील आयक्यूएसी विभागाने हे संकलन केले आहे. या संकलनाचे कार्य डॉ. सुनिता दानाई यांनी केले आहे. या संकलित आवृत्तीमुळे संशोधकांना एकाच पुस्तकात सर्व लेख वाचायला मिळणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एम. जी. ताकवले, संस्थेचे खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, सहसचिव आत्माराम जाधव, जिल्हा बॅंकेचे संचालक सुरेश घुले, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. लतेश निकम, डॉ. राहुल नरंगळकर, डॉ. सुजाता टापरे, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. दत्तात्रय संकपाळ, दत्तात्रय बेसके, वैशाली कोरडे, विद्या खराडे आदी उपस्थित होते.

8.7
OVERALL SCORE
Time Limits and Duties: 9
Recording Notes: 10
Word Length and Substance: 7
Have no any user vote
The rating of each criteria is about my personal opinions about how much they are important than others

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!