स्वारगेटमध्ये मिरवणुक; ट्रॅक्टर झाडाच्या फांदीत अडकल्याने पुलगेटपर्यंत कोंडी

स्वारगेटमध्ये मिरवणुक; ट्रॅक्टर झाडाच्या फांदीत अडकल्याने पुलगेटपर्यंत कोंडी

शेकडो वाहनचालकांचा खोळंबा; वाहतूक नियोजनावर नागरिकांचा संतप्त सवाल

पुणे :

स्वारगेट बस डेपोसमोरील मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या मिरवणुकीदरम्यान ध्वनिवर्धक बसविलेला ट्रॅक्टर झाडाच्या फांदीला अडकल्याने शनिवारी सायंकाळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली. या घटनेमुळे गोळीबार मैदान ते पुलगेटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

अचानक झालेल्या वाहतूक कोंडीमुळे दुचाकी, चारचाकी, पीएमपीएमएल बस आणि अन्य वाहनांचा वेग पूर्णपणे ठप्प झाला. हजारो नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला.

या घटनेनंतर वाहतूक नियोजनावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढी मोठी मिरवणूक सुरू असताना पर्यायी वाहतूक व्यवस्था आणि पुरेसा बंदोबस्त का ठेवण्यात आला नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

दरम्यान, अडकलेला ट्रॅक्टर हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, बराच वेळ वाहतूक विस्कळीत राहिल्याने स्वारगेट परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!