सय्यद नगर रेल्वे गेट परिसरात वाहतूक बदल; पर्यायी मार्गांचा वापर करा .

सय्यद नगर रेल्वे गेट परिसरात वाहतूक बदल; पर्यायी मार्गांचा वापर करा .

पुणे : सय्यद नगर रेल्वे गेट परिसरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा पाइपलाइनच्या कामादरम्यान मोठी पाण्याची पाइप फुटल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काळेपडळ वाहतूक विभागाने तात्पुरते वाहतूक बदल लागू केले आहेत.

वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, 5 जून 2026 पासून वाहतूक सुरळीत होईपर्यंत सय्यद नगर रेल्वे गेट ते सय्यद नगर अंडरपास या मार्गावर एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

वाहतूक वळविण्यात आली

सय्यद नगर अंडरपासकडून येणारी वाहतूक काळेपडळ अंडरपास आणि अटल बिहारी वाजपेयी अंडरपास मार्गे वळविण्यात आली आहे.

नागरिकांसाठी सूचना

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवास सुरक्षित ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

  • सय्यद नगर अंडरपासकडून सय्यद नगर, हांडेवाडी आणि मोहम्मदवाडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी सय्यद नगर अंडरपास – काळेपडळ अंडरपास – अटल बिहारी वाजपेयी अंडरपास या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
  • वाहतूक पोलिसांकडून आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांनी सूचनांचे पालन करावे.

वाहतूक पोलिसांचे आवाहन

वाहतूक शाखेने नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे परिसरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवणे शक्य होणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

– वाहतूक शाखा, पुणे शहर

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!