
मिरवणुकीत कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाची तक्रार आहे? कॉल करा!
पुणे पोलिसांकडून 44 ठाण्यांसाठी नोडल अधिकारी नेमले; यादी जाहीर*
पुणे : गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत आहे? आता थेट तक्रार करा. पुणे शहर पोलिसांनी ध्वनी प्रदूषणावर नियंत्रणासाठी मोठे पाऊल उचलले आहे.ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, 2000 अन्वये कारवाईसाठी शहरातील *44 पोलीस ठाण्यांसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी* नेमण्यात आले आहेत.
गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषणासंदर्भात तक्रार आहे?
आपल्या परिसरातील संबंधित नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
पोलिसांचे आवाहन : शांततेत विसर्जन… पर्यावरणाचे रक्षण!
नागरिकांच्या सहकार्याने ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण करण्याचे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. अनावश्यक मोठ्या आवाजाचे डीजे, लाऊडस्पीकर टाळून नियमांचे पालन करावे.
तक्रारीसाठी या नंबरवर संपर्क साधा – संपूर्ण यादी फोटो मध्ये हडपसर (9028501397), काळेपडळ (8806907321), फुरसुंगी (9730495162), मांजरी (7021636749), वानवडी (9921144018) सह शहरातील सर्व 44 ठाण्यांची यादी पोलिसांनी जाहीर केली आहे.

