
हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयात इच्छुकांची लगबग; दोन अर्ज दाखल
हडपसर : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीकृत नगरसेवक सदस्यपदासाठी इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक १५, १६ आणि १७ मधून आतापर्यंत ४२ अर्जांची विक्री झाली आहे. त्यापैकी आज दोन इच्छुकांनी अर्ज दाखल केले.
प्रभाग क्रमांक १५ मधून १५ अर्जांची, प्रभाग क्रमांक १६ मधून १६ अर्जांची, तर प्रभाग क्रमांक १७ मधून ११ अर्जांची विक्री झाली आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, आज प्रभाग क्रमांक १५ मधून सागर बाळासाहेब प्रभुणे यांनी, तर प्रभाग क्रमांक १६ मधून दीपक हिंगणे यांनी आपले अर्ज दाखल केले. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
आगामी काळात आणखी इच्छुकांकडून अर्ज दाखल होण्याची शक्यता असून, स्वीकृत नगरसेवकपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे हडपसर-मांजरी परिसरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

