उंड्री-कोंढवा क्षेत्रीय कार्यालयात २६ स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज विक्री

उंड्री-कोंढवा क्षेत्रीय कार्यालयात २६ स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज विक्री

कोंढवा : पुणे महापालिकेच्या उंड्री-कोंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक ४० आणि ४१ मधून स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांकडून अर्जांची विक्री सुरू आहे. प्रभाग क्रमांक ४० मध्ये १६, तर प्रभाग क्रमांक ४१ मध्ये १०, असे एकूण २६ अर्ज विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.

स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, विविध राजकीय पक्षांशी संबंधित तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींकडून या पदासाठी अर्ज घेतले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात या पदासाठी होणारी निवड प्रक्रिया लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

उंड्री-कोंढवा परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसह राजकीय इच्छुकांनीही या प्रक्रियेत सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रभाग ४० आणि ४१ मधून स्वीकृत नगरसेवकपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!