
वानवडीमध्ये १७ अर्जांची विक्री; अद्याप एकही अर्ज दाखल नाही
पुणे : स्वीकृत नगरसेवक पदासाठी वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत आतापर्यंत १७ अर्जांची विक्री झाली आहे. मात्र, यापैकी एकही अर्ज अद्याप दाखल झालेला नाही, अशी माहिती क्षेत्रीय कार्यालयाकडून देण्यात आली.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांकडून अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज विक्रीला प्रतिसाद मिळत असला, तरी प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यास अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे अर्ज विकत घेणारे इच्छुक प्रत्यक्षात उमेदवारी दाखल करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतरच वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून स्वीकृत नगरसेवक पदासाठी किती जणांनी प्रत्यक्ष अर्ज दाखल केले, हे स्पष्ट होणार आहे.
अर्ज विक्री : १७
अर्ज दाखल : एकही नाही

