ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन ट्रांजेक्शन करून फसवणूक

हडपसर:
ज्येष्ठ नागरिक कुटूंबापासून लांब राहत असल्याचा फायदा घेवून, त्यास व्यसानाच्या आहारी नेवून २४ लाखांची ऑनलाईन ट्रांजेक्शन करून फसवणूक करणाऱ्या दोघांना हडपसर पोलीसांकडून अटक केली.
फिर्यादी स्नेहल अशोक झरेकर रा मगरपट्टा सिटी रोड, हडपसर सध्या रा- बैंगलोर कर्नाटक यांचे चहील अशोक शंकर हारेकर वय ६४ वर्ष यांचे अकाऊंन्ट चा ऑनलाईन अॅक्सेस घेवून वेगवेगळ्या अनोळखी व्यक्तींच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करुन एकूण रक्कम रुपये २४,४८,०००/- रुपयांची फसवणुक केल्याने हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याचा तपास संजय मोगले, यरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक, गुन्हे आणि अंमलदार संदीप राठोड, सचिन गोरखे, गायत्री पवार, तेजस पांडे असे करीत असताना, फिर्यादी यांचेकडून माहीती घेतली असता, फिर्यादी यांचे वडिल हे कुटूंबापासून वेगळे एकटेच राहत होते.
त्यांना दैनंदिन गरजेच्या कामामध्ये ते राहत असलेल्या ठिकाणी चाँचमन म्हणून काम करणारा हनीफ नावाचा इसम मदत करीत असलेबाचत माहीती प्राप्त झाली. फिर्यादी यांचे वडिलांचे अकाऊंन्टवरून ट्रांजेक्शन झालेले रक्कमेचायत बँकेकडून माहीती प्राप्त करून त्याची पडताळणी केली असता, ती रक्कम हफ्तीकार खान आणि नूर जहाँ यांचे बैंक अकाऊन्टयर ट्रांन्सफर झाल्याबाचत दिसून आले. तसेच वॉचमन म्हणून काम पाहणारा इसम हनीफ हा घटनेनंतर काम सोडून फरार झाला होता.
संशयीत इसमांचे मोबाईल नंबर हे बंद इाल्याचे दिसून आले. गुन्ह्याचे केले तांत्रिक तपासामध्ये हनीफ आणि इफ्तीकार खान हे एकमेकांच्या संपर्कात असलेबाबत दिसून आले. संशयीत इसमाबाबत उपयुक्त माहीती गोळा करून पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, चंद्रकांत रेजितवाड, अमोल दणके, गायत्री पवार यांचे पथक गोवंडी, मुंबई येथे जावून त्यांनी केले तपासामध्ये आरोपी इफतीकार रहिमखान पठाण वय ३१ वर्षे, रा. रेहान पार्क, गौतम नगर, गोवंडी मुंबई त्यास ताब्यात घेतले.
आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याचेकडून हनीफ बाबत माहीती घेतली असता ती सध्या हांडेवाडी येथे राहत असल्याबाबत माहीती प्राप्त झाली. त्यावरून पोलीस अंमलदार अविनाश गोसाथी, कुंडलीक केसकर पांनी आरोपी मोहम्मद हनीफ मोहम्मद अफसर वय ५२ वर्षे, सध्या रा. म्हसोबा मंदिराचे पाठीमागे, गौरव दुबे यांचेकडे भाड्याने, काळेपडळ, मुळ रा.- पातूर, ता. पातुर जि. अकोला यास ताब्यात घेतले.
आरोपींकडे तपासात त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच सांगीतले की, मोहम्मद हनीफ मोहम्मद अफसर आणि इफतीकार रहिमखान पठाण हे नात्याने एकमेकांचे मेव्हणे असल्याचे सांगीतले, तसेच मोहम्मद हनीफ मोहम्मद अफसर हा सिक्युरीटी म्हणून काम करीत असताना, त्यास अशोक झारेकर हे वेगवेगळी कामे सांगत होते त्यामुळे अशोक झरेकर हे एकटे राहत असल्याचाबत इफतीकार पठाण यास हनीफ मार्फत समजले होते.
त्यामुळे आरोपी यांनी आपसात संगनमत करून अशोक हारेकर यांचेसोबत ओळख वाढवून, त्यांना व्यसनाचे आहारी नेवून, वेळोवेळी एकत्र बसून, त्यांचे मोबाईलचा व बँकीग अॅक्सेस घेवून, त्यांचे बैंक खात्यावरील रक्कम आरोपींनी स्वतःचे व आपले नातेवाईकांचे बैंक खात्यांवर परस्पर वळवून, रक्कम रुपये २४,४८,०००/- रुपयांची फसवणूक केल्याचे सांगीतले. आरोपी यांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास निलेश जगदाळे हे करीत आहेत.