तरोडे वस्ती ते कृष्णा नगर हा रस्ता पूर्णपणे उखडला

हडपसर :
तरोडे वस्ती ते कृष्णा नगर हा रस्ता पूर्णपणे उखडला असून त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

सहा महिन्यापूर्वीच हा रस्ता पुणे मनपा डांबरीकरण केले होते. परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता पुन्हा उघडला गेला. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले गेले.

पुण्याकडे जाण्यासाठी कृष्णा नगर वानवडी येथून जाणारा हा जवळचा रस्ता असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. परंतु कंत्राटदाराने आणि त्यावर लक्ष देणाऱ्या जेई ज्युनिअर इंजिनियर अभियंताने कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे कामाच्या बाबतीत दर्जा न ठेवल्यामुळे रस्त्यावर पुन्हा खड्डे पडलेले आहे.

पालिकेचे पैसे त्यामुळे व्हायला जात आहे. पालिकेचं डांबर खाताय कोण ? असा सवाल आता नागरिक करत आहे.
Pune महानगरपालिकेची आणि टॅक्स भरणाऱ्या नागरिकांची अशाप्रकारे फसवणूक केली जात आहे , याला जबाबदार कोण ?
असा सवाल नागरिक करीत आहे.

निकृष्ट दर्जाचे काम करणारे कंत्राटदार याच्यावर कारवाई कधी होणार ? ज्या अभियंताने रस्ता तयार करताना लक्ष दिले नाही किंवा कामात कसूर केली त्याच्यावर कारवाई होणार का असा सवाल नागरिक करीत आहे.

जोपर्यंत पुणे मनपाचे अधिकारी आणि आणि कंत्राटदार यांची मिली भगत तोपर्यंत पुणे महानगरपालिकेतील टॅक्स भरणाऱ्या नागरिकांच्या खिशावर दरोडा पडत राहणार अशी भावना या भागातील नागरिक अर्जुन सातव नाझीम शेख शराफत पानसरे निलेश वाडकर यांनी बोलून दाखवली आहे