हडपसर मध्ये दफनभूमी आहे की दारूड्यांचा अड्डा ?

हडपसर :
हडपसर मधील लिंगायत समाजाच्या दफन भूमीत मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हडपसर माळवाडी येथे पुणे मनपाची अमर धाम स्मशान भूमी आहे त्याच्या शेजारी लिंगायत धर्माची दफन करण्यासाठी दफनभूमी आहे. या दफनभूमीला मागील बाजूने सीमा भिंत तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना नाही. या ठिकाणी गर्दुल्ले दारुडे व इतर समाजकंटक दिवसा येऊन रात्री अपरात्री येऊन या ठिकाणी धुडगूस घालतात. गांजा फुकतात, इंजेक्शनची नशा करतात. दारू पितात.त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच त्याचप्रमाणे इंजेक्शन सापडत आहेत.

डिसेंबर महिन्यात रात्री साडेअकरा वाजता बेकायदेशीरपणे व्यवसाय करणारा खाजगी वखार वाला आणि त्याचा मालक त्याचे कर्मचारी यांच्यासमवेत पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी कंत्राटी सुरक्षा कामगार दारूची पार्टी करीत होते. तसेच मटणाची पार्टी ही जोडण्यात आली. यावेळी सदर सर्व घटना वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्या ठिकाणी थातूरमातूर कारवाई करून प्रश्न मिटवण्यात आला. परंतु त्यानंतर ही असाच प्रकार पाहायला मिळत आहे. सुरक्षा रक्षक नेमके करतात तरी काय ? ते नक्की कोणाची सुरक्षा करतात? कामावर हजर न राहता घरी जाऊन झोपा काढतात का काय? येथे येणाऱ्या समाजकंटकांबरोबर दारूच्या पार्ट्या मटणाच्या पार्ट्या झोड तात काय ? असा सवाल आता उपस्थित होत आहे. तसेच वरिष्ठ अधिकारी देखील याची संपूर्ण चौकशी न करता दोषींना पाठीशी घालण्याचे पाप करीत आहे. यामुळे मुजोर आणि बेशिस्त कंत्राटी सुरक्षा रक्षकांना एक प्रकारे धुडगूस घालण्याचे दारू पार्टी जोडण्याचा परवानाच दिला नाही ना? अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.

मध्यंतरी कुत्र्याने जळलेल्या मृतदेहाचे लचके तोडण्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यावेळी स्मशानभूमीतील सुरक्षा आणि सुरक्षेचे कर्मचारी यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते ?त्यावर देखील सुरक्षा विभागाकडून चौकशी झाल्याचे फक्त दिखावा करण्यात आला.

कोणावरही कारवाई करण्यात आली नाही . मुजोर कंत्राटी सुरक्षा रक्षकांना त्यामुळे विशिष्टपणा आणि मुजोरगिरी करण्याचे अभय मिळाले. आणि दारूच्या पार्टी बरोबर दिवसाही होऊ लागल्या आहे काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.

या दफनभूमीत सुरक्षारक्षक असताना कॅमेरे असताना दारुडे येतात तरी कसे? हा सवाल आहे. खाजगी बेकायदेशीर विनापरवाना वखार वाला या पार्ट्यांचे आयोजन करीत आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे अतिक्रमण केलेल्या या वखार वाढल्यावर कारवाई होताना दिसत नाही

नागरिकांनी उपस्थित केलेले सवाल.
१)दफनभूमी दफन करण्यासाठी आहे की दारू पिण्यासाठी ?
२)येथे दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळेस शान फिरत असतात शांत ठिकाणी तळ ठोकून असतात सुरक्षारक्षक काय करतात मग सुरक्षारक्षक काय करतात?
३) पालिकेचे सुरक्षा अधिकारी मुकादम सहाय्यक सुरक्षा अधिकारी यांचे कंत्राटी सुरक्षा रक्षकांवर नियंत्रण नाही का?
४) बेकायदेशीर विनापरवाना असलेल्या लाकूड वखारीला अतिक्रमनाला नक्की कोणाचे अभय आहे ?
५) स्थानिक लोकप्रतिनिधी, हडपसर क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण अधिकारी, मालमत्ता विभागाचे अधिकारी, की स्थानिक गुंड ,..?
6) दफनभूमीत रोज दारूच्या पार्ट्या होत असताना तसेच श्वान दिवसभर तळ ठोकून असताना अधिकारी कारवाई न करता कंत्राटी सुरक्षा रक्षकांना अभय देतात असे चित्र निर्माण झाले आहे, त्या सर्वांवर कारवाई होणार तरी कधी ?