कुख्यात गुंड टिपु पठाण व त्याचा भाऊ इजाज पठाण जेरबंद

हडपसर,
खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे कुख्यात गुंड टिपु पठाण व त्याचा भाऊ इजाज पठाण यांना काळेपडळ पोलीसांनी जेरबंद केले आहे
सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने काळेपडळ पोलीस ठाणे येथे येवून मागील तीन वर्षापासून रेकॉर्डवरील गुन्हेगार टिपू पठाण, व त्यांचा भाऊ इजाज पठाण यांनी त्यांचेसोबत ०७ ते ०८ साथीदारा सोबत घेवून बेकायदेशीर जमाव करुन वारंवार सय्यदनगर, हडपसर, पुणे येथील तक्रारदार महिलेल्या मालकीची सव्र्व्हे नंबर ७५/६ मधील १२९० स्के फुट मोकळ्या प्लॉटवर येवून, ही जागा माझी असुन, सदर जागा मी माझा भाऊ इजाज पठाण यांचे नावाने खरेदी केली आहे.

सदर जागेवर बांधलेले पत्र्याचे शेड काढून घ्या. नाहीतर जागा कशी खाली करुन ताब्यात घ्यायची हे मला चांगले माहिती आहे असे बोलुन, प्लॉटमधील पत्र्याचे शेड उचकटून त्यावर असलेले माझे नाव खोडून टिपू पठाण याने जागा पाहीजे असलेस २० लाख रुपयाची मागणी करुन आमचे सोबत वाद घालून जबरदस्तीने माझे प्लॉटया ताबा घेण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार दिल्याने काळेपडळ पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील रेकॉर्डवरील आरोपी रिझवान ऊर्फ टिषु सत्तार पठाण यांने कव्वालीचे कार्यक्रमात नोटा उधळल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर त्यास तात्काळ ताब्यात घेवून त्यांचेवर पोलीसांकडून प्रतिबंधक कारवाई करुन १४ दिवस येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
नमुद गुन्ह्याचा तपास करीत असताना कुख्यात गुंड इजाज सत्तार पठाण याचा सहभाग निष्यन्न झाल्याने त्यास काळेपडळ पोलीस ठाणे कडील तपास पथक नियुक्त करुन, तांत्रीक विष्लेशन व बातमीदारांमार्फत सव्यदनगर परिसरात शोध घेत असताना आरोपी इजाज पठाण हा सव्यदनगर परिसरात येणार असल्याची बातमी मिळाल्याने तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन शिताफिने त्यास सव्यनगर रेल्वे पटरीच्या जवळ ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव इजाज सत्तार पठाण, वय ३९ वर्षे, रा. सय्यद नगर, हडपसर, पुणे असे असून त्यास गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली आहे. असून न्यायालयाने त्याची दिनांक ०७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नमुद गुन्ह्यात इतर आरोपींचा ०२ पथके नेमूण शोध घेवून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहे

सदरची कामगिरी ही डॉ. श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे, सहा पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, युवराज दुधाळ, पोलीस अंमलदार शाहिद शेख, अतुल पंधरकर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे, महादेव शिंदे, यांनी करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.